कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:31 AM2023-10-02T11:31:23+5:302023-10-02T11:32:26+5:30

विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप करणारी महिला आहे तरी कोण?

a woman slams vivek agnihotri says he drunk abused me while kangana ranaut praised film the vaccine war | कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...'

कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...'

googlenewsNext

'द काश्मीर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमामुळे चर्चेत आहेत. कोरोना काळात भारताच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कोव्हिड प्रतिबंधक लस संशोधनाचा प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. सिनेमाने बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळवलं नसलं तरी एक चांगली कलाकृती असल्याचं ट्वीट करत कंगनाने सिनेमावर टीका करणाऱ्यांना झापलं आहे. तर कंगनाच्या ट्वीटवर एका महिलेने प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्रींवरच गैरवर्तनाचा आरोप लावलाय.

'द व्हॅक्सीन वॉर' संदर्भात कंगनाने ट्वीट करत लिहिले,'कोणत्याही सिनेमाबाबत तुम्हाला इतकं वाईट का लिहायचं असतं? यश हे केवळ पैशातच मोजलं जातं का? अशा कलाकारांचा अपमान का करता? प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमांमध्ये व्हॅक्सीन वॉरला चांगले रिव्ह्यूज मिळाले आहेत. स्वत:मध्येच बनलेली ही चांगली कलाकृती आहे हे सिनेमाचं यश नाही का? सगळेच व्यवसाय नफाच बघतात का? काही फलदायी असतात काही नसतात. '

ती पुढे लिहिते,'गिधाडांप्रमाणे नेहमी प्रेत का शोधता? मृत्यूपत्र लिहित आहात का? लाज वाटली पाहिजे. तुमच्यासारखे घरी बसणारे लोक ज्यांना फिल्म्सचा फ ही माहित नाही तरी तुम्ही इतकं वाईट,क्रूर आणि जजमेंटल कसे होऊ शकता? '

कंगनाचं हे ट्वीट एका महिलेने रिट्वीट करत लिहिले,'त्याला पाठिंबा देऊ नकोस. विवेक अग्निहोत्रीएवढा वाईट कोणी नाही. त्याने नशेत माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं. तो चांगला कलाकार असणं दूरच. तो शाहरुख खानबद्दल काय म्हणाला हे बघितलंच आहे. त्याला तुझ्यासारख्या स्पष्ट बोलणाऱ्याकडून सहानुभूतीची गरज नाही.'

विवेक अग्निहोत्रींनी अद्यारप महिलेच्या या आरोपांना उत्तर दिलेलं नाही. एरवी इतरांवर टीका करणाऱ्या अग्निहोत्रींवर आता महिलेनेच गंभीर आरोप केलेत. ही महिला सीतू महाजन कोहली असून ती आर्किटेक्ट आहे. स्वत: कंगना रणौतही तिला ट्विटरवर फॉलो करते.

Web Title: a woman slams vivek agnihotri says he drunk abused me while kangana ranaut praised film the vaccine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.