शिल्पा शेट्टीच्या दोन्ही मुलांमध्ये सुरु झाली भांडणं, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:36 IST2022-11-14T18:35:43+5:302022-11-14T18:36:40+5:30

आज बालदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर कोणी स्वत:चेच बालपणीचे फोटो टाकले आहेत.

A fight started between Shilpa Shetty's two sons, the video went viral | शिल्पा शेट्टीच्या दोन्ही मुलांमध्ये सुरु झाली भांडणं, व्हिडिओ व्हायरल

शिल्पा शेट्टीच्या दोन्ही मुलांमध्ये सुरु झाली भांडणं, व्हिडिओ व्हायरल

आज बालदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर कोणी स्वत:चेच बालपणीचे फोटो टाकले आहेत. आजच्या दिवशी सगळेच बालपणाच्या आठवणीत हरवून गेले आहेत. ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांचीकशी मस्ती चालते, भांडणं चालतात, त्यांचे एकमेकांवरचे प्रेम असेच फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिसत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचे दोन्ही मुलं भांडताना दिसत आहेत. 

शिल्पा शेट्टी आणि करण कुंद्रा हे बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल आहे. शिल्पाने २०१२ मध्ये मुलाला जन्म दिला ज्याचे नाव विआन आहे. १० वर्षांचा छोटा विआन त्याच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असतो. तर २०२० मध्ये शिल्पा सरोगसीद्वारे समिशा या चिमुकलीचे आगमन झाले. गोंडस समिशा चे फोटोही सोशल मीडियावर झळकत असतात. तर विआन आणि समिशा या भावाबहिणीचा भांडतानाचा व्हिडिओ शिल्पाने पोस्ट केला आहे. तिने कॅप्शन मध्ये म्हणले आहे की, 'या मुलांचे आभार तेच खरे आयुष्यातील स्ट्रेसबस्टर आहेत ज्यांच्यामुळे टेंशन दूर होते. आपल्यात नेहमी लहान मुल जीवंत असले पाहिजे. बालदिनाच्या शुभेच्छा.'

दरम्यान शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर मॉम क्लब ने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही पोस्टवर हार्ट इमोजी दिले आहेत. उर्वशी रौतेलानेही यावर कमेंट केली आहे. 

Web Title: A fight started between Shilpa Shetty's two sons, the video went viral