ऐश्वर्या रायसारखी दिसणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक, शॉर्ट स्कर्टमधील स्नेहाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:10 IST2025-11-25T18:09:27+5:302025-11-25T18:10:30+5:30
Sneha Ullal : सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्रींना लाँच केले आहे. त्यापैकी २००५ मध्ये आलेल्या 'लकी: नो टाइम फॉर लव' या चित्रपटातील अभिनेत्री तर रातोरात लोकप्रिय झाली होती.

ऐश्वर्या रायसारखी दिसणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक, शॉर्ट स्कर्टमधील स्नेहाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्रींना लाँच केले आहे. त्यापैकी २००५ मध्ये आलेल्या 'लकी: नो टाइम फॉर लव' या चित्रपटातील अभिनेत्री तर रातोरात लोकप्रिय झाली होती. या अभिनेत्रीचे निरागस डोळे आणि सौंदर्य पाहून लोक इतके वेडे झाले की त्यांनी तिला ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून संबोधले आणि स्नेहा उल्लालने एकाच चित्रपटातून सर्वांच्या मनावर अधिराज्य केले. यानंतर तिने अनेक वर्षे चित्रपटाच्या पडद्यापासून आणि लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत केले, परंतु आता ती पुन्हा आपल्या लूक्समुळे चर्चेत आली आहे.
३७ वर्षांची झालेल्या स्नेहा उल्लालचे रोज नवनवीन लूक्स समोर येत आहेत, ज्यात ती एकापेक्षा एक ग्लॅमरस कपडे परिधान करून कहर करताना दिसते. अशातच आता तिने छोट्या शॉर्ट्सवर जाळीदार, आरपार दिसणारा स्कर्ट परिधान करून अत्यंत सिजलिंग लूकमध्ये दाखवले आहे. याचे फोटो समोर येताच चाहते तिच्यावर फिदा झाले आणि तिला ऐश्वर्याची जुळी बहीण म्हणून संबोधले.
स्नेहा उल्लालचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी ती रातोरात स्टार बनली होती. मात्र, त्यानंतर ती अचानक गायबही झाली आणि आता जेव्हा ती परत आली आहे, तेव्हाही तिच्या चाहत्यांचे प्रेम तिच्यासाठी तसेच कायम आहे. म्हणूनच, तिच्या या अदा पाहून सगळे तिच्यावर घायाळ झाले आहेत.
ब्रालेटसोबत शॉर्ट्सचे कॉम्बिनेशन
स्नेहाच्या या किलर लूकबद्दल बोलायचं झाल्यास तिने स्कर्टला खूपच अनोख्या पद्धतीने स्टाईल केले आहे. यात तिने ब्रालेट टॉपसोबत छोटे शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. हे पाहून पहिल्या नजरेत तिचा लूक बॉडीसूटसारखा वाटला, पण जशी ती जमिनीवर पडून पोझ देऊ लागली, तेव्हा शॉर्ट्स आणि ब्रालेटचे कॉम्बिनेशन लक्षात आले. हे परिधान करून स्नेहाने आपले सिजलिंग रूप दाखवले आहे.