सनी देओलच्या 'गदर ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, दिग्दर्शक म्हणाले- "कथा पुढे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:27 IST2025-08-12T18:27:00+5:302025-08-12T18:27:49+5:30

Gadar 3 Movie: २०२३ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. अनिल शर्मा यांनी 'गदर ३'बद्दल एक मोठी अपडेट दिली.

A big update came out regarding Sunny Deol's 'Gadar 3', the director said- ''The story will move forward...'' | सनी देओलच्या 'गदर ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, दिग्दर्शक म्हणाले- "कथा पुढे..."

सनी देओलच्या 'गदर ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, दिग्दर्शक म्हणाले- "कथा पुढे..."

२०२३ मध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा 'गदर २' (Gadar 2 Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. अनिल शर्मा (Anil Sharma) यांचा मुलगा उत्कर्ष शर्मानेही त्यात मुख्य भूमिका साकारली होती. फक्त ६० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 'गदर २'नं जगभरात ६९१ कोटी रुपयांचा जबरदस्त गल्ला केला. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दोन वर्षे उलटली आहेत. दरम्यान आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

सनी देओलच्या 'गदर २'च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आयएएनएसशी खास संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट ५०० कोटी रुपये कमवेल हे त्यांना माहित होते. रिलीज होण्यापूर्वीच त्यांनी झी स्टुडिओला याबद्दल एक ईमेल पाठवला होता. यासोबतच त्यांनी त्याच्या भाग ३ बद्दलची अपडेट देखील शेअर केली. अनिल शर्मा म्हणाले की, त्यांना माहित होतं की हा चित्रपट सुपरहिट होईल. दिग्दर्शक म्हणाले, ''गदर हा एक प्रचंड हिट चित्रपट होता. पण गदर २ला पहिल्या दिवसापासूनच प्रचंड यश मिळाले. खरंतर, २ ऑगस्ट रोजी मी झीला एक ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये चित्रपट ५०० कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आगाऊ बुकिंग सुरू होण्यापूर्वीच हे घडले.''

'गदर २'च्या वेळी सर्वात मोठे आव्हान कोणते होते?
'गदर २' बनवताना सर्वात आव्हानात्मक भाग कोणता होता? याचे उत्तर देताना चित्रपट निर्माते म्हणाले, ''माझ्यासाठी आव्हान म्हणजे गदर १ ची कथा पुढे नेण्याचा मार्ग शोधणे. आम्ही त्यावर बराच वेळ विचार केला. पण जेव्हा कथा शेवटी तयार झाली तेव्हा वाट पाहणे सार्थक झाले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 'गदर'मध्ये मुलाची भूमिका करणारा उत्कर्ष 'गदर २'मध्ये प्रौढ म्हणून परत येत आहे. मला वाटते की जगात पहिल्यांदाच एखादा बालकलाकार मोठा झाल्यानंतर त्याच भूमिकेची पुनरावृत्ती करत असेल.''

'गदर ३'बद्दल मोठी अपडेट
अनिल शर्मा यांनी 'गदर ३'बद्दल एक मोठी अपडेट देखील दिली. ते म्हणाले, ''आम्ही निश्चितच 'गदर ३' बनवत आहोत. कथा पुढेही सुरू राहील. 'गदर' आणि 'गदर २' या दोन्ही चित्रपटांच्या यशावरून दिसून येते की त्याची कथा आणि पात्रे लोकांच्या मनात विशेष स्थान बनवलंय आणि तिसऱ्या भागातही हे कायम राहील.''

Web Title: A big update came out regarding Sunny Deol's 'Gadar 3', the director said- ''The story will move forward...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.