Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 13:27 IST2024-03-02T13:26:44+5:302024-03-02T13:27:48+5:30

वैजयंतीमालांनी ९० व्या वर्षी नृत्याचा आविष्कार करत सर्वांना थक्क करुन सोडलंय

90 year old actress Vaijayantimala performed a unique dance in front of Ram temple ayodhya | Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार

Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार

भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणजे वैजयंतीमाला. वैजयंतीमालांनी बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांतून लोकांच्या मनात त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. वैजयंतीमाला या दिग्गज अभिनेत्री आहेतच पण त्यांच्या नृत्याची सुद्धा खुप चर्चा होत असते. अशातच वैजयंतीमालांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी राम मंदिरासमोर अनोख्या नृत्याविष्कारातून श्रीरामाची आराधना केलेली दिसतेय.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर अनेक कलाकार ‘रागसेवा’ कार्यक्रमात सहभागी होत आहेत.  26 जानेवारीपासून रामलला मंदिराच्या आवारात 'राग सेवा' कार्यक्रम सुरू झालाय. याच कार्यक्रमात वैजयंतीमाला सहभागी झाल्या. वैजयंतीमालांनी सुंदर नृत्याविष्कार करुन सर्वांनाच थक्क करुन सोडलंय. त्यांनी नृत्यातून श्रीरामाची आराधना केलीय. त्यांच्या नृत्याला सगळीकडून वाहवा मिळाली आहे.

90 वर्षीय अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी रामलल्लाच्या मंदिरात राग सेवा केली. त्यांनी मंदिरात भरतनाट्यम नृत्य केले. त्यांना या वयात डान्स करताना पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झालेले दिसले. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ९० व्या वर्षी वैजयंतीमालांनी केलेला नृत्याविष्कार पाहून सर्वांनाच आनंद झालेला दिसतोय.

 

Web Title: 90 year old actress Vaijayantimala performed a unique dance in front of Ram temple ayodhya