गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:09 PM2022-01-24T16:09:19+5:302022-01-24T16:12:25+5:30

Pushpa The Rise : निर्मात्यांच्या ध्यानात आल्या नाहीत, तुमच्या तरी ध्यानात आल्या का ‘पुष्पा’मधील या चुका?

5 Major Mistakes Pushpa The Rise Made allu arjun starrer Pushpa 5 biggest mistakes in movie | गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? 

गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? 

googlenewsNext

 Allu Arjun's film  Pushpa: The Rise : अल्लू अर्जुनच्या  (Allu Arjun) ‘ पुष्पा’ची  ( Pushpa: The Rise) चर्चा अद्यापही थांबलेली नाही.  बॉक्स ऑफिसवर सिनेमानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार हवा आहे. चित्रपटाची गाणी, डायलॉग, कलाकार सगळ्यांचीच जबरदस्त चर्चा आहे. तुम्हीही हा चित्रपट पाहिला असेलच. पण या चित्रपटातील पाच मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत.

पुष्पाची गाडी

चित्रपटाच्या सुरूवातीचा एक सीन तुम्ही पाहिला असेलच. पहिल्यांदा अल्लू अर्जुन उर्फ पुष्पा आणि त्याचा मित्र केशव गाडीत बसतात, तेव्हा त्यांना गाडीचा दरवाजाही उघडता येत नाही. पण थोड्याच वेळात केशव नवी गाडी खरेदी करून ती फुल स्पीडमध्ये चालवत पुष्पाच्या घरी नेतो. आता ज्या माणसाला गाडीचा दरवाजा उघडता येत नव्हतो, तो गाडी कशी काय चालवू शकतो, कमाल आहे ना?

रक्तचंदन चक्क पाण्यावर तरंगलं

पुष्पा हा सिनेमा लाल चंदन अर्थात रक्त चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, रक्तचंदनाचा एक छोटाशा तुकडाही पाण्यात टाकल्यास तो लगेच पाण्यात बुडतो. तज्ज्ञ सांगतात की, लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते.  पण ‘पुष्पा’ची बातचं न्यारी. या चित्रपटातील रक्तचंदनाचे ओंडके चक्क पाण्यावर तरंगताना दिसतात.  पोलिसांची रेड पडते तेव्हा पुष्पा रक्तचंदन नदीत फेकतो आणि नंतर पाण्यात तरंगणाऱ्या या लाकडांवरून उड्या मारत पळून जाताना दिसतो.

पोलिसांना खड्डा दिसलाच नाही...

 एक सीन तुम्हाला आठवत असेलच. पुष्पा पोलिसांपासून वाचण्यासाठी आपला ट्रक खड्ड्यात पाडतो. हा खड्डा रस्त्याच्या कडेला असतो. मग पोलिस पुष्पाचा पिच्छा करतात तेव्हा त्यांना तो इतका मोठा खड्डा कसा दिसला नाही बुवा? कच्च्या रस्त्यावरचे ट्रकच्या टायरचे निशानही पोलिसांना दिसत नाहीत.  ट्रक न शोधताच पोलिस पोलिस थेट पुष्पाला पकडतात अन्  पकडून गाडीत घेऊन जातात. हा सीन डोक्यात पटत नाही.

 ड्रायव्हरशिवाय फिरला ट्रक

‘ऐ बिड्डा ये मेरा अड्डा’ या गाण्यात पुष्पा अर्थात अल्लू अर्जुनला एकदम कूल अंदाजात दाखवलं आहे. पण हे करताना या गाण्यात दिग्दर्शकानं मोठी चूक केली आहे. होय, पुष्पा ट्रकच्या बोनटवर जबरदस्त पोझ देताना या गाण्यात दिसतो. याचदरम्यान ट्रक वेगाने फिरतो. हा सीन जरा बारकाईने बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की, ट्रकमध्ये ड्रायव्हर नाही. म्हणजेच ड्रायव्हरशिवाय ट्रक वेगाने फिरताना दिसतो.

नदीत चालवली बाईक

श्रीनूचा मेहुणा मोगलिसला मारतानाचा सीन पाण्यात चित्रीत करण्यात आला आहे. नदीत मोठमोठे दगड आहे पण पुष्पा मोगलिसला मारण्यासाठी नदीत येतो आणि बाईकवरून नदीत अ‍ॅक्शन करताना दिसतो. नदीत इतके दगड असताना बाईक गोलगोल फिरवण्याचा सीन लॉजिकली मनाला पटत नाही. पण हे सगळं चित्रपटातच होऊ शकतं, खऱ्या आयुष्यात नाही, हेही खरं.
 

Web Title: 5 Major Mistakes Pushpa The Rise Made allu arjun starrer Pushpa 5 biggest mistakes in movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.