४१व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 08:45 IST2024-04-04T08:45:05+5:302024-04-04T08:45:28+5:30

'आवारा पागल दिवाना' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नाच्या ५ वर्षांनी घरी पाळणा हलणार

41 years old bollywood atcress Aarti Chabria pregnant become mother soon | ४१व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली गुडन्यूज

४१व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली गुडन्यूज

गेल्या वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरात पाळणा हलला आहे. आलिया भट, बिपाशा बासू यांच्या घरात चिमुकलीचं आगमन झालं. तर काही दिवसांपूर्वी अभिनेता विक्रांत मेसीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता बॉलिवूडमधील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला बाळाची चाहुल लागली आहे. 'आवारा पागल दिवाना' फेम अभिनेत्री आरती छाबडिया लवकरच आई होणार आहे. आरतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

आरतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत आरतीने बेबी बंप फ्लॉन्ट करत आई होणार असल्याचं सांगितलं आहे. आरतीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी काळातील ग्लो स्पष्ट दिसून येत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी आरतीचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

बॉलिवूड सिनेमांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आरतीने २०१९ साली विशारद बीडासी यांच्याशी लग्न केलं. विशारद बीडासी एक चार्टर्ड अकाऊंटंट असून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असतात. लग्नानंतर ५ वर्षांनी आरती आणि विशारद आईबाबा होणार आहेत. आरती ४१ व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आई होण्यासाठी ती उत्सुक आहे.  

आरतीने लज्जा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'आवारा पागल दीवाना', 'तुमसे अच्छा कौन है', 'शादी नंबर १', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'पार्टनर' यांसारख्या सिनेमात ती दिसली. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'व्याह ७० किमी' या सिनेमात आरती शेवटची दिसली होती. गेल्या कित्येक काळापासून ती सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे.

Web Title: 41 years old bollywood atcress Aarti Chabria pregnant become mother soon