3 फुटांच्या या अभिनेत्याची पत्नी आहे 'लयभारी',अभिनेत्रींप्रमाणे दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 09:00 IST2021-09-22T09:00:00+5:302021-09-22T09:00:00+5:30

केके गोस्वामीने त्याची बेस्ट फ्रेंडसह लग्न करत संसार थाटला आहे. पिंकू असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. पिंकूदेखील उंचीच्या बाबतीत केके सारखीरच आहे.

3 foots short guy actor K K Goswami's wife is too gorgeous than Any Other actress, SEE PICS | 3 फुटांच्या या अभिनेत्याची पत्नी आहे 'लयभारी',अभिनेत्रींप्रमाणे दिसते फारच सुंदर

3 फुटांच्या या अभिनेत्याची पत्नी आहे 'लयभारी',अभिनेत्रींप्रमाणे दिसते फारच सुंदर

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय अभिनेता केके गोस्वामीने. दिसायला तो इतर अभिनेत्यांप्रमाणे नसला तरी आज इंडस्ट्रीत त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उंची फक्त 3 फूट एवढी आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान अशीच कामगीरी आज त्याने केली आहे. केके गोस्वामीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. केके गोस्वामीने मालिकाच नाहीतर सिनेमातही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे. 

केकेला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी बराच संघर्षही करावा लागला आहे. कितीही समस्या समोर आल्या असल्या तरी तो डगमगला नाही. हार न मानता त्यांतून तो वाट काढत यश गाठत गेला. संघर्षाच्या काळात केकेच्या दोन वेळच्या जेवणासाठीही कसरत करावी लागायची. ७ ते ८ वर्ष फक्त एकच चपाती खात दिवस काढले आहेत. उंचीमुळे त्याला अनेकदा लोकांचे टोमणेही ऐकावे लागायचे. शाळेत असातानाही त्याची लोकं खिल्ली उडवायचे. 

एकदा एखा  माणसाची त्याच्यासह भेट झाली. त्याने केकेला बीअर बारमध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. नोकरी जर मिळाली तर चांगले जेवणही मिळेल आणि  500-700 रुपये मिळतील असे सांगण्यात आले. त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर, केकेनेही बिअर बार गाठले.तो आत जात असल्याचे पाहून गेटवरच्या वॉचमनने त्याला रोखले आणि हातातल्या दांडुक्याने त्याला मारलेही. या घटनेनेंतर केकेने कोणत्याही परिस्तिती अभिनय क्षेत्रातच काम मिळवायचे असाच निर्धार केला. त्यानंतर त्याला इंडस्ट्रीत हळूहळू काम मिळालयाही सुरुवात झाली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

केके गोस्वामीने त्याची बेस्ट फ्रेंडसह लग्न करत संसार थाटला आहे. पिंकू असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. पिंकूदेखील उंचीच्या बाबतीत केके सारखीरच आहे. पिंकूची उंचीही ५ फूट इतकी आहे. दोघांची जोडी एकदम अनोखी वाटत असली तरी दोघांनाही पाहून मेड फॉर इचर अदर कपल असेच चुम्हीही म्हणाल. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. विशेष म्हणजे पिंकू दिसायलाही फार सुंदर आहे. 

पिंकूला केके आवडत होता. त्याच्यावर तिचे जीवापाड प्रेम होते. दोघांच्याही लग्नाला पिंकूच्या घरच्यांचा विरोध होता. पण पिंकूला त्याच्या उंचीमुले कोणताच प्रॉब्लेम नव्हता. शेवटी तिने घरच्यांचा विरोध असूनही लग्न केले आणि संसार थाटला.आज दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप सुखी आहे. दोघांचाही सुखाने संसार सुरु आहे. 

Web Title: 3 foots short guy actor K K Goswami's wife is too gorgeous than Any Other actress, SEE PICS