बाबो! 'गली बॉय' Rapper Divine चा धमाका, नव्या 'मिरची' गाण्याला १ दिवसात २३ लाख व्ह्यूज!

By अमित इंगोले | Updated: October 20, 2020 11:05 IST2020-10-20T11:04:18+5:302020-10-20T11:05:16+5:30

रॅपर डिवाइनने शनिवारी ट्विट करून माहिती दिली की, '२४ तासात २३ लाख' स्टायलोनेही ट्विट केलं होतं की, '२४ तासात २३ लाख व्ह्यूज'.

23 lakh views in 1 day on rapper divines new song | बाबो! 'गली बॉय' Rapper Divine चा धमाका, नव्या 'मिरची' गाण्याला १ दिवसात २३ लाख व्ह्यूज!

बाबो! 'गली बॉय' Rapper Divine चा धमाका, नव्या 'मिरची' गाण्याला १ दिवसात २३ लाख व्ह्यूज!

लोकप्रिय रॅपर डिवाइनचं नवं गाणं रिलीज झालं असून या गाण्याला २४ तासात यूट्यूबवर २३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतक्या प्रेमासाठी डिवाइनने चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे गाणं डिवाइन, एमसी अल्ताफ, फिनोम आणि स्टायलो जी ने गायलं आहे. याचे बोल डिवाइन, एमसी अल्ताफ आणि स्टायलो जी ने लिहिले आहेत. तर या रॅपला म्युझिक पिनाकी रतन उर्फ फिनोमने दिलं आहे. 

डिवाइनने शनिवारी ट्विट करून माहिती दिली की, '२४ तासात २३ लाख' स्टायलोनेही ट्विट केलं होतं की, '२४ तासात २३ लाख व्ह्यूज'. आता तर या गाण्याचे व्ह्यूज वाढून ३७ लाखांपेक्षा अधिक झाले आहेत. हे गाणं पूर्णपणे डान्स नंबर आहे. ज्यात जबरदस्त रॅपचा वापर करण्यात आलाय.

दरम्यान, गेल्यावर्षी रिलीज झालेला रणवीर सिंहचा 'गली बॉय' सिनेमा हा रॅपर डिवाइनच्या जीवनावर आधारित होता. यात रणवीर सिंहने डिवाइनची भूमिका साकारली होती. तर सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं होतं. या सिनेमानंतर डिवाइन अधिक जास्त प्रकाशझोतात आला. काही लोकांपुरती असलेली त्याची ओळख आता घराघरात ओळख वाढली आहे. तसेच या सिनेमातून प्रेरित होऊन आता अनेक तरूण मंडळी रॅप करू लागले आहेत.
 

Web Title: 23 lakh views in 1 day on rapper divines new song