20 Yrs Of Lagaan: तेव्हा कुठे आमिरने ‘लगान’साठी दिला होता होकार, आज ‘लगान 2’ बनला तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:53 AM2021-06-15T10:53:37+5:302021-06-15T10:56:01+5:30

20 Years of Lagaan: चार वेळा स्टोरी ऐकली, दोन वर्ष वाट पाहायला लावली...! ऑस्कर नॉमिनेटेड ‘लगान’ या सुपरडुपर हिट सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्ष पूर्ण झालीत.

20 Years of Lagaan aamir khan talk about film | 20 Yrs Of Lagaan: तेव्हा कुठे आमिरने ‘लगान’साठी दिला होता होकार, आज ‘लगान 2’ बनला तर..

20 Yrs Of Lagaan: तेव्हा कुठे आमिरने ‘लगान’साठी दिला होता होकार, आज ‘लगान 2’ बनला तर..

googlenewsNext
ठळक मुद्देआज 20 वर्षांनंतरही आम्ही एकमेकांना त्यांच्या पात्रांच्या नावाने हाक मारतो. मी आजही लाखाला लाखा म्हणतो. तो सुद्धा मला भुवन म्हणतो, असेही आमिरने सांगितले.

ऑस्कर नॉमिनेटेड ‘लगान’ (Lagaan) या सुपरडुपर हिट सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्ष (20 Years of Lagaan) पूर्ण झालीत. 2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे 15 जूनला ‘लगान’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यानिमित्ताने ‘लगान’शी जुळलेल्या काही रोचक गोष्टी,काही रोचक किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आमिर खानने ( Aamir Khan) या सिनेमाच्या काही आठवणी शेअर केल्यात.

आमिरसाठी सर्वार्थाने खास होता सिनेमा...
‘लगान’सारखा सिनेमा बनवला जात नाही तर स्वत: बनतो, हे शब्द आहेत आमिरचे. आमिरसाठी हा सिनेमा अनेकार्थाने खास होता. निर्माता म्हणून हा त्याचा पहिला सिनेमा होता त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट खास होता.

चार वेळा स्टोरी ऐकली, दोन वर्ष वाट पाहायला लावली...
होय, आमिरने या सिनेमासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरला दोन वर्ष ताटकळत ठेवले होते. आमिरने याबद्दल सांगितले की, आशुतोष माझा खूप चांगला मित्र आहे. पण तो पहिल्यांदा ‘लगान’ची कथा घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी, कथा थोडी ऐकली होती. चित्रपटात क्रिकेट आहे म्हटल्यावर माझा इंटरेस्ट कमी झाला होता. नहीं यार, मैं ये फिल्म नहीं करूंगा, असे मी त्याला म्हणालो होतो. यानंतर आशुतोषने अनेकांना ही स्टोरी ऐकवली होती. पण प्रत्येकाकडून त्याला नकार मिळाला होता. यानंतर आम्ही पुन्हा भेटलो. यावेळी मात्र एकदा स्टोरी ऐक तर, असे आशुतोष मला आग्रहाने म्हणाला. असे करता करता ही कहाणी एकदा म्हणता म्हणता मीचारदा ऐकली आणि मला तीआवडली. आता हा चित्रपट प्रोड्यूस कोण करणार, ही अडचण होती. त्याने माझ्यावरच जबाबदारी टाकली. जा एखादा निर्माता शोध, असे आशुतोष मला म्हणाला. पण माझ्यामुळे कुणी हा सिनेमा प्रोड्यूस करावा, असे मला नको होते. अशात दीड वर्ष गेले. मात्र मनात कुठेतरी हा सिनेमा बनावा, लोकांनी पाहावा, असे मला सतत वाटत होते. अखेर मीच या सिनेमासाठी तयार झालो. मी यात अ‍ॅक्टिंगही करणार आणि प्रोड्यूसही करणार, असे मी ठरवून टाकले. अशाप्रकारे ‘लगान’ मी प्रोड्यूस केलेला पहिला सिनेमा ठरला. कारण त्याआधी प्रोड्यूसर बनण्याचा मी कधीच विचार केला नव्हता.

मी ती कहाणी जगलोय...
आम्ही तो सिनेमा, ती कहाणी अक्षरश: जगलो. 6 महिने गुजरातच्या भुजमध्ये गावाचा सेटवर आम्ही शूटींग करत होतो आणि एकाच बिल्डिंगमध्ये थांबलो होतो. पहाटे 4 वाजता शूटींग सुरू व्हायची आणि सेटवर 300 लोक एकत्र काम करायचे. या 6 महिन्यांत आम्ही एक कुटुंब बनलो होतो. आज 20 वर्षांनंतरही आम्ही एकमेकांना त्यांच्या पात्रांच्या नावाने हाक मारतो. मी आजही लाखाला लाखा म्हणतो. तो सुद्धा मला भुवन म्हणतो, असेही आमिरने सांगितले.

लगान 2 बनला तर...
कुणाला लगानचा पार्ट 2 बनवायची इच्छा असेल तर आम्ही आनंदाने राईट्स देऊ. लगानचा सीक्वल कसा बनतो, हे पाहणे आमच्यासाठीही इंटरेस्टिंग असेन. आम्ही हा सिनेमा बनवला तेव्हा आम्हाला अनेक अडचणी आल्या होत्या. आज लगान 2 बनला तर अन्य अभिनेत्याला भुवनच्या भूमिकेत पाहणे मला आवडेल. रणबीर कपूर, रणवीर सिंग, विकी कौशलसारखे चांगले कलाकार आहेत. ते या भूमिकेला माझ्यापेक्षाही चांगला न्याय देऊ शकतील, असेही आमिर म्हणाला.

Web Title: 20 Years of Lagaan aamir khan talk about film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.