सरत्या वर्षात बॉलीवूडने अनुभवले ‘कभी खुशी कभी गम’
By Admin | Updated: December 28, 2015 03:19 IST2015-12-28T03:19:52+5:302015-12-28T03:19:52+5:30
येणारे प्रत्येक नवीन वर्ष चांगले-वाईट अनुभव आपल्यासोबत घेऊन येत असते. मनासारखे यश मिळाले की, लोकं आनंदोत्सव साजरा करतात आणि निराशा पदरी पडली की हताशही होतात. हाच निकष बॉलीवूडलाही लागू होतो.

सरत्या वर्षात बॉलीवूडने अनुभवले ‘कभी खुशी कभी गम’
येणारे प्रत्येक नवीन वर्ष चांगले-वाईट अनुभव आपल्यासोबत घेऊन येत असते. मनासारखे यश मिळाले की, लोकं आनंदोत्सव साजरा करतात आणि निराशा पदरी पडली की हताशही होतात. हाच निकष बॉलीवूडलाही लागू होतो. दरवर्षी येथे शेकडो चित्रपटांची निर्मिती केली जाते. यातले काही बॉक्स आॅफिसवर इतिहास घडवतात, तर काहींचे साधे नावही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. 2015 मध्येही असेच घडले. बॉलीवूडचा खरा खेळ चालतो तो नंबर गेमवर. बॉक्स आॅफिसच्या आकड्यांवरून चित्रपटाचे यश व अपयश ठरविले जात असते. या निकषानुसार 2015 मध्ये नंबर गेमच्या या खेळात कोणाची सरशी झाली, 100 करोड क्लबमध्ये कोण सहभागी झाले, त्याचा हा लेखाजोखा आम्ही सीएनएक्समध्ये मांडत आहोत.
स्टार आॅफ द ईअर : 2015 या वर्षांत अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. काही आपल्या बजेटमुळे चर्चेत राहिले, तर काही आपल्या कमाईमुळे. विशेष म्हणजे, सलमान खान या वर्षीचा मोठा स्टार ठरला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात पहिल्या व दुसऱ्या स्थानावर त्याचेच चित्रपट आहेत. सलमानच्या दोन्ही चित्रपटांनी 527 कोटींची कमाई केली. शाहरूख खान, वरुण धवन यांच्याही चित्रपटांनी चांगली कमाई केली.
सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट म्हणून ‘बजरंगी भाईजान’चे नाव घ्यावे लागेल. या पाठोपाठ ‘प्रेम रतन धन पायो’ व तनू वेड्स मनू रिटन्स्चा क्रमांक लागतो. सलमान खान २०१५ सालातील टॉपचा अभिनेता ठरला आहे. त्याचे दोन चित्रपट सर्वाधिक कमाई करणारे ठरले, तर तनू वेड्स मनूच्या यशानंतर कंगनाने आपले मानधन वाढविले.
चित्रपट कलावंत / दिग्दर्शक कमाई
बजरंगी भाईजानसलमान खान / कबीर खान 320.34
प्रेम रतन धन पायोसलमान खान / सूरज बडजात्या207.40
तनू वेड्स मनू रिटन्स्कंगणा रानौत/ आनंद आर. लाल152.00
(कोटी रुपयांत)
बॉलीवूडमध्ये आता नंबर गेमला महत्त्व मिळाले असले, तरी देखील ‘टॅलेंट’ हाच एकमेव यशाचा निकष आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. केवळ मोठी नावे हिच यशाची गुरुकिल्ली आहे असे नाहीच. शाहरूख, सलमान किंवा आमीर खान यांच्या चित्रपटांना टॅलेंटेड दिग्दर्शकाने हाताळले नाही तर काय होऊ शकते याची जाणीव ‘दिलवाले’ने करून दिली, तर टॅलेंटड अॅक्टर व डायरेक्टरचा मिलाफ यशाची नवी शिखरे पादाक्रांत करू शकतो, हे पीकेच्या यशावरून स्पष्ट झाले. जाणकार दिग्दर्शकाने स्टारक डून मेहनत करून घेतली तर काय होऊ शकते, हे बजरंगी भाईजानने दाखवून दिले. टीमवर्क छान असेल तर यश कसे पायाशी लोळण घालते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तनू वेड्स मनू रिटन्स् आहे.
स्मॉल बजेट
तरी सुपरहिट
या वर्षी सुपर हिट दर्जा केवळ चार चित्रपटांना मिळाला. सुपरहिटच्या यादीत बजरंगी भाईजान नंतर स्माल बजेट सिनेमांची वर्णी लागली आहे. यात तनू वेड्स मनू रिटन्स्, प्यार का पंचनामा व हेट स्टोरी 3 चा उल्लेख करता येईल. या तिन्ही चित्रपटांचे बजेट बजरंगी भाईजानहून कमी होते. ‘प्यार का पंचनामा’ केवळ 6.20 कोटी रुपयांत तयार झाला, तरी तो चांगला चालला.
बजेटच्या तुलनेत अधिक कमाई
या वर्षांत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांचे बजेट कमी असले, तरीदेखील त्यांनी केलेली कमाई हा चर्चेचा विषय ठरला. बजेटच्या तुलनेत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटात कंगना राणावत व आर. माधवनचा ‘तनू वेड्स मनू रिटन्स्’ने बाजी मारली. टी-सीरिजच्या ‘हेट स्टोरी’ मालिकेतील तिसऱ्या चित्रपटाने बॉलीवूडच्या बजेट चित्रपटांना यशाची नवी दिशा दिली.
परदेशातही कमाईचा विक्रम
चित्रपटांची कमाई विदेशात व्हावी, यासाठी निर्माते ओव्हरसिज रीलिजचे प्रयत्न करतात. भारतासह विदेशात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये आमीर खानच्या चित्रपटांनी बाजी मारली आहे. परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल 10 चित्रपटात या वर्षीच्या 6 चित्रपटांचा समावेश आहे. शाहरूख व आमीरची क्रेझ विदेशातही आहे हे, यातून स्पष्ट होते.
कमी कालावधीत 100 कोटी क्लबमध्ये
चित्रपटांच्या कमाईच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, कमी कलावधीत 100 कोटी क्लबमध्ये सामील होणाऱ्या चित्रपटांना विशेष स्थान दिले जाते. यात खान्सचा बोलबाला कायम होताच.
चित्रपट 100 कोटी (दिवस) एकूण कमाई
हॅप्पी न्यू ईअर3205.00
बजरंगी भाईजान 3320.34
धूम 3 3280.25
प्रेम रतन धन पायो3 207.40*
चेन्नई एक्स्प्रेस 3+226.70
पीके 4339.50
अक्षय पैसा वसूल करणारा स्टार
अक्षय कुमारचे या वर्षी चार चित्रपट प्रदर्शित झाले. हे सर्वच चित्रपट चांगली कमाई करणारे ठरले. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा चित्रपटात अक्षयच्या सर्व चित्रपटांची वर्णी लागली आहे. बेबी, सिंग इज ब्लिंग, गब्बर इज बॅक व ब्रदर हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले. त्याच्या चारही चित्रपटांनी एकूण 350 कोटीहून अधिकचा गल्ला जमविला.
पहिल्या 10 दिवसांतही पैशांचा पाऊस : कोणातही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या चित्रपटाचे पहिले दोन आठवडे महत्त्वाचे ठरतात. चित्रपट दुसऱ्या आठवड्यात कायम राहत असेल, तर तो लोकांच्या पसंतीला पडला आहे, असे समजले जाते. यात बजरंगी भाईजान आघाडीवर असून, आमीर खानचा पीके ने पहिल्या 10 दिवसांत 236.50 कोटीची कमाई, आदित्य चोपडाच्या ‘धूम 3’ने 227 कोटीची कमाई केली. हे चित्रपट या यादीत टॉप 3 मध्ये सामील असले, तरीदेखील धूम 3 हा चित्रपट फ्लॉप मानला जातो. या पाठोपाठ शाहरूखच्या चित्रपटांचा क्रमांक लागतो.