बॉलीवूडचा ‘फ्रेश ट्रेंड’ हीरोपेक्षा ‘मोठी’ हीरोइन!

By Admin | Updated: September 1, 2016 02:33 IST2016-09-01T02:33:31+5:302016-09-01T02:33:31+5:30

पन्नाशी ओलांडलेल्या सलमानने गेल्या वर्षी ३० वर्षांच्या सोनम कपूरशी ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये स्क्रीन शेअर केली. यानंतर तो ‘सुल्तान’मध्ये २७ वर्षांच्या अनुष्का शर्मासोबत दिसला.

Bollywood 'Fresh Trend' Hero 'Heroine' | बॉलीवूडचा ‘फ्रेश ट्रेंड’ हीरोपेक्षा ‘मोठी’ हीरोइन!

बॉलीवूडचा ‘फ्रेश ट्रेंड’ हीरोपेक्षा ‘मोठी’ हीरोइन!

पन्नाशी ओलांडलेल्या सलमानने गेल्या वर्षी ३० वर्षांच्या सोनम कपूरशी ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये स्क्रीन शेअर केली. यानंतर तो ‘सुल्तान’मध्ये २७ वर्षांच्या अनुष्का शर्मासोबत दिसला. शाहरूख खाननेही पन्नाशी ओलांडली; पण चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवत अधिक तरुण दिसण्याच्या लालसेने स्वत:पेक्षा कमी वयाच्या हीरोइनसोबत रोमान्स करताना तोसुद्धा जराही कचरला नाही. पण हेच हीरोइनबाबत म्हणाल, तर काही वर्षांपूर्वीपर्यंत तशी कल्पनाही बॉलीवूडमध्ये करवत नव्हती. अगदी लग्न झाले रे झाले, की अभिनेत्रींच्या करिअरला ओहोटी लागायची. पण आता हा ट्रेंड बदललाय. नायिकाप्रधान चित्रपट प्रेक्षकांनी जितक्या सहजपणे स्वीकारले, अगदी तितक्याच सहजपणे वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींचा यंग हीरोंसोबतचा रोमान्सही प्रेक्षक स्वीकारू लागले आहेत. लवकरच येऊ घातलेला ‘बार बार देखो’, ‘ऐ दिल है मुश्किल’ हे चित्रपट असोत किंवा अगदी अलीकडे येऊन गेलेला ‘की अ‍ॅण्ड का’ असो हे व असे अनेक चित्रपट या बदलत्या ट्रेंडची आदर्श उदाहरणे आहेत. याच फ्रेश ट्रेंडवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...


प्रियांका चोप्रा
‘गुंडे’ या चित्रपटात तिशीत असलेल्या प्रियांका चोप्राने पंचविशी ओलांडलेल्या रणवीर कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांसोबत स्क्रीन शेअर करण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेतला. स्वत:पेक्षा यंग हीरोशी स्क्रीन शेअर करताना ती अगदी सहज दिसली.


विद्या बालन
विद्या बालन तिच्यापेक्षा सुमारे ४ वर्षांनी लहान शाहीद कपूरसोबत ‘किस्मत कनेक्शन’मध्ये रोमान्स करताना दिसली, पण चॉकलेट बॉय शाहीद व विद्याची जोडी पडद्यावर तितकीच विजोड दिसली. परंतु, यानंतरही एका वर्षाने लहान इम्रान हाश्मीसोबत ‘डर्टी पिक्चर’मध्ये रोमान्स करण्याची रिस्क विद्याने उचलली.


कोंकणा सेन कोंकणा सेन हीसुद्धा तिच्यापेक्षा ४ वर्षे लहान रणबीर कपूरसोबत ‘वेक अप सिड’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली. अर्थात, ही जोडी चित्रपटाच्या कथानकाच्या चौकटीत अगदी फिट बसली.


ऐश्वर्या रॉय
मोठी हीरोइन आणि लहान हीरो हेच समीकरण करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातही दिसणार आहे. ४२ वर्षांची, एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या रॉय-बच्चन तिच्यापेक्षा पुरत्या दहा वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूरशी आॅनस्क्रीन रोमान्स करताना या चित्रपटात दिसेल. या दोघांमधील इन्टेन्स केमिस्ट्री यात दिसणार असल्याची हॉट चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे. यापूर्वीही गुरू, रावण आणि उमराव जान या चित्रपटांत ऐश्वर्या तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या अभिषेक बच्चनशी (ऐश्वर्याचा रीअल लाइफ पती) रोमान्स करताना दिसली होती.


करीना कपूर
‘की अ‍ॅण्ड का’ या अलीकडे येऊन गेलेल्या चित्रपटात करीना कपूर आणि अर्जुन कपूर ही जोडी दिसली. पस्तिशीची करीना आणि तिशीतला अर्जुन या चित्रपटात दिसले. पण, पडद्यावर करीना आणि अर्जुन यांच्यातील वयाचा फरक आडवा आला नाही. याउलट, त्यांच्या दोघांमधील केमिस्ट्रीचीच अधिक चर्चा झाली. एक मै और एक तू आणि गोरी तेरे प्यार में या दोन चित्रपटांतही करीना तिच्यापेक्षा ‘यंग’ असलेल्या इम्रान खानसोबत रोमान्स करताना दिसली.


कतरिना कैफ
‘बार बार देखो’ या आगामी चित्रपटात ३३ वर्षांची कतरिना कैफ ३१ वर्षांच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. कतरिना आतापर्यंत खान, कपूर यांच्यासोबतच रोमान्स करताना दिसली; पण अलीकडे कतरिना तिच्यापेक्षा यंग हीरोंसोबत दिसू लागली आहे. बार बार देखो या चित्रपटाआधी कतरिना फितूरमध्ये आदित्य राय कपूरसोबत दिसली होती. आदित्यही कतरिनापेक्षा लहान. पण कतरिनाने ‘ओल्डर हीरोइन विथ यंग हीरो’ या समीकरणाशी चांगलेच जुळवून घेतले.

Web Title: Bollywood 'Fresh Trend' Hero 'Heroine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.