बॉलीवूडची दिवाळी

By Admin | Updated: November 7, 2015 00:50 IST2015-11-07T00:50:48+5:302015-11-07T00:50:48+5:30

दिवाळीत सर्वत्र आतषबाजी करून हा सण साजरा केला जातो. बॉलीवूडही या देशातील सर्वांत मोठ्या फेस्टिव्हलसाठी विशेष तयारी करीत असतो. दिवाळीत विविध ब्लॉकबस्टर चित्रपट

Bollywood Diwali | बॉलीवूडची दिवाळी

बॉलीवूडची दिवाळी

- प्रकाशपर्वात अनेक चित्रपटांना मिळाले यश

दिवाळीत सर्वत्र आतषबाजी करून हा सण साजरा केला जातो. बॉलीवूडही या देशातील सर्वांत मोठ्या फेस्टिव्हलसाठी विशेष तयारी करीत असतो. दिवाळीत विविध ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित करण्याची जणू परंपराच तयार झाली आहे. विशेषकरून या काळात बॉलीवूडमधील ‘खानस्’चे चित्रपट प्रेक्षकांसाठी एखाद्या गिफ्टसारखेच झाले आहेत. यंदा सलमान खान सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातून त्याच्या फेमस ‘प्रेम’ची भेट घेऊन येत आहे. दिवाळीच्या शुभपर्वावर झळकलेल्या व मोठे यश मिळवलेल्या अशाच काही सिनेमांची ही यशोगाथा...

- ऐतराझ : २००४ साली दिवाळीच्या वेळी प्रदर्शित झालेला हा सिनेमा हिट ठरलाच होता. शिवाय या चित्रपटाला व कलावंतांना अ‍ॅवॉर्ड नॉमिनेशन मिळाले होते. हा चित्रपट एका ‘बोल्ड’ विषयावर आधारित होता. प्रियंका चोप्रा हिचा निगेटिव्ह व खुला रोल हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या यशानंतर प्रियंका चोप्राला अनेक पावरपॅक्ड भूमिका आॅफर झाल्या.
- डॉन : १९७८ साली आलेल्या अमिताभ बच्चन अभिनित डॉन या चित्रपटाचा हा रिमेक होता. मात्र या चित्रपटात शाहरूखने आपल्या पद्धतीने अभिनय करीत प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने ख्रिसमसच्या सुट्यांमधील बॉक्स आॅफिस कलेक्शन मिळविले. या भव्यदिव्य यशाचा आधार घेत दिग्दर्शकांनी एक पाऊल पुढे टाकत ‘डॉन-2’ या नव्या चित्रपटाची निर्मिती केली.
- ओम शांती ओम : कोरिओग्राफरपासून दिग्दर्शक झालेल्या फराह खान हिचा हा पहिला चित्रपट होता. फराहने प्रेक्षकांना व बॉलीवूडला दिवाळीच्या निमित्ताने दीपिका पदुकोण ही नायिका भेट दिली. बॉलीवूडचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या अपोझिट ती या चित्रपटात आली. सावळ्या वर्णाच्या या अभिनेत्रीने पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांच्या -दिल तो पागल है : डीटीपीएच या नावाची ओळख असलेला यश चोपडा दिग्दर्शित ‘म्युझिकल रोमान्स’ असलेला हा चित्रपटही १९९७ साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. डान्सर्स व ट्रुपमधील प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात शाहरूख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
- कुछ कुछ होता है : हा चित्रपट ट्रेंड सेटिंग ठरला. कॉलेज गोइंग तरुणांसाठी हा परफेक्ट चित्रपट होता. या चित्रपटाने बॉय-गर्ल फ्रेंडशिपची ओळख करून दिली. कॉलेज कॅम्पसमध्ये शार्ट ड्रेस घालण्याचे प्रस्थही या चित्रपटानंतरच आले.
- राजा हिंदुस्थानी : १९९६ साली आमीर खान-करिश्मा कपूर स्टारर या चित्रपटाने कमाईचा उच्चांक गाठला होता. या चित्रपटातील गीते ९० च्या दशकाची आठवण करून देणारी असली तरी उत्तर व पूर्व भारतात खूप लोकप्रिय ठरले. करिश्मा कपूरचा अभिनय व लूक भूमिकेला न्याय देणारा ठरला. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्ड मिळाला.
- दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे : नाम तो सुना ही होगा... हा फेमस डायलॉग याच चित्रपटातील आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाचे नावच पुरेसे आहे.

Web Title: Bollywood Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.