बॉलिवूडची ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बंधनात
By Admin | Updated: September 27, 2016 18:21 IST2016-09-27T18:21:17+5:302016-09-27T18:21:17+5:30
एकीकडे बॉलिवूडमध्ये वेगळं हाण्याचा ट्रेंड सुरु आसतानाचं हाऊसफुल ३ ची अभिनेत्री लिसा हेडन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बंधनात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - एकीकडे बॉलिवूडमध्ये वेगळं हाण्याचा ट्रेंड सुरु आसतानाचं हाऊसफुल ३ ची अभिनेत्री लिसा हेडन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
इन्स्टाग्रामवरून आपल्या होणा-या नव-याचा फोटो शेअर करत लिसा हेडनने विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी अगदी स्टाईलिश पद्धतीने दिली आहे. दिनो लालवानी या आपल्या प्रियकरासोबतचा फोटो तिने शेअर केला आहे. यात ती दिनोला किस करताना दिसते. त्यास तिने कॅप्शन दिले की, याच्यासोबत मी लग्न करतेय. गेल्या एक वर्षापासून हे प्रेमीयुगुल एकमेकांना डेट करत होते.
चेन्नईत जन्मलेल्या लिसाने तिचे बहुतेक आयुष्य भारताबाहेरच काढले आहे. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करियर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली.