अबब...! शाहरुख- काजोलच्या 'या' गाण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले तब्बल 'इतके' कोटी, आकडा जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:21 IST2025-09-14T14:19:40+5:302025-09-14T14:21:56+5:30

बाबो! आयलँडवर शूट अन्...; ७ कोटी खर्चून तयार झालेलं हे बिग बजेट गाणं

bollywood actor shahrukh khan and kajol dilwale movie gerua song shot in iceland cost 7 crore know about unknown facts | अबब...! शाहरुख- काजोलच्या 'या' गाण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले तब्बल 'इतके' कोटी, आकडा जाणून थक्क व्हाल

अबब...! शाहरुख- काजोलच्या 'या' गाण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले तब्बल 'इतके' कोटी, आकडा जाणून थक्क व्हाल

Bollywood Cinema: बॉलिवूड अभिनेता शाहरुख आणि काजोल यांची जोडी इंडस्ट्रीतील आयकॉनिक जोडींपैकी एक आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्या जोडीने बॉलीवूडमध्ये एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या दोघांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं आहे.'दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे','माय नेम इज खान' ते २०१५ साली प्रदर्शित झालेला 'दिलवाले' सिनेमातही ही जोडी एकत्र दिसली होती. या चित्रपटाप्रमाणे त्यातील शाहरुख-काजोलवर चित्रित केलेल्या गेरुआ गाण्याची सुद्धा चांगली चर्चा झाली. हे गाणं जितकं लोकप्रिय झालं तितकं ते बनवण्यासाठी तसेच शूटसाठी अनेक अडचणी आल्या होत्या. याबद्दल कोरिओग्राफर फराह खानने खुलासा केला आहे.

अलिकडेच फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी यांच्यासोबत संवाद साधला.त्याचदरम्याने तिने शाहरुख आणि काजोलच्या गेरुआ गाण्याच्या काही आठवणी शेअर केल्या. त्याचबरोबर फराहने असंही सांगितलं की, "शाहरुख खान आणि काजोलचं हे गाणं आइलँडमध्ये शूट केलेलं एकमेव हिंदी गाणं आहे. दरम्यान, या व्लॉगमध्ये फराह खान म्हणाली, "आइलँड खूप महागडी जागा आहे. आम्ही फक्त दोन लोकांसोबत तिथे शूट केलं, त्याचं बजेट ७ कोटी रुपये होतं. गेरुआ गाण्याचं शूट आइलँडवर करण्यात आलंय."

पुढे ती म्हणाली, "गेरुआ' हे या चित्रपटातील सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. आयलँडच्या थंड वातावरण असलेल्या ठिकाणी गाणं शूट करणं सगळ्यात मोठं आव्हान होतं. याशिवाय आमच्या प्रोडक्शन टीमलाही खूप अडचणींचा सामना करावा लागला."

दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' हा सिनेमाा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानसह वरुण धवन, कृती सनॉन, बोमन ईराणी आणि वरुण शर्मा यांसारखे कलाकार देखील होते. या रोमकॉम चित्रपटाला प्रेक्षकांची उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: bollywood actor shahrukh khan and kajol dilwale movie gerua song shot in iceland cost 7 crore know about unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.