" मेनु अंग्रेजी समझ नी सी आरी..." दिलजीतचं उत्तर अन् एकच हशा; प्रतिक्रियेने जिंकली चाहत्यांची मनं 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 03:21 PM2024-03-29T15:21:16+5:302024-03-29T15:24:57+5:30

लोकप्रिय पंजाबी गायक तसेच अभिनेता म्हणून ओळख असलेला अभिनेता दिलजीत दोसांझचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

bollywood actor diljit dosanjh video goes viral  says i don't understand english while talking with show host  | " मेनु अंग्रेजी समझ नी सी आरी..." दिलजीतचं उत्तर अन् एकच हशा; प्रतिक्रियेने जिंकली चाहत्यांची मनं 

" मेनु अंग्रेजी समझ नी सी आरी..." दिलजीतचं उत्तर अन् एकच हशा; प्रतिक्रियेने जिंकली चाहत्यांची मनं 

Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी गायक तसेच अभिनेता म्हणून ओळख असलेला अभिनेता दिलजीत दोसांझचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलिकडेच दिलजीत त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला होता. दरम्यान, दिलजीत त्याचा आगामी चित्रपट 'चमकीला' चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. त्या दरम्यान एका प्रमोशन इव्हेंटमध्ये त्याने केलेलं विधान चर्चेत आलंय.  

'चमकीला' सिनेमाच्या प्रमोशनवेळी दिलजीतने त्याच्या सहकलाकारांसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने या चित्रपटाबाबतीत भाष्य केलं. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ए.आर.रहमानसह अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील या शोमध्ये उपस्थित होती.  

दरम्यान, या कार्यक्रमात दिलजीतने आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंच शिवाय आपल्या साधेपणानं प्रेक्षकांची मनंही जिंकलं. लाईव्ह कार्यक्रमात अभिनेत्याला होस्टने विचारलेल्या प्रश्नावर त्याने असं काही उत्तर दिलं की जे ऐकून उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. 

कार्यक्रमाची होस्ट इंग्रजीत संवाद साधत अभिनेता दिलजीत दोसांझच कौतुक करते. दिलजीत मोठ्या कुतुहलाने तिच्याकडे पाहत असतो. तेवढ्यात होस्ट त्याला प्रश्न विचारते आणि दिलजीत त्याच्या पंजाबी स्टाईलने उत्तर देतो. ''मेनु अंग्रेजी समझ नी सी आरी'' त्याच्या या उत्तराने प्रेक्षक देखील हसू लागतात.

Web Title: bollywood actor diljit dosanjh video goes viral  says i don't understand english while talking with show host 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.