अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:16 IST2025-06-12T16:06:52+5:302025-06-12T16:16:30+5:30

रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान, खुलासा करत म्हणाला...

bollywood actor aamir khan confirm cameo in rajnikanth coolie movie says | अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट 

अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट 

Aamir Khan :बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या आगामी चित्रपट सितारे जमीन पर मुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. मुलांच्या आयुष्यातील महत्वाच्या मुद्यांना स्पर्श करणारा तसेच पालक आणि मुलांमधील संवादाचं महत्त्व पटवून देणारा हा चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 'सितारे जमीन पर' मध्ये आमिर खानसोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा २० जूनला देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, अलिकडेच आमिर खान रजनीकांत यांच्या कूली चित्रपटात कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा प्रचंड जोर धरु लागल्या होत्या. त्यावर आता अभिनेत्याने 'सितारे जमीन पर' च्या प्रमोशनदरम्यान भाष्य करत खरं काय ते सांगितलं आहे. 

मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांवर आमिर खान लोकेश कनगराज दिग्दर्शित कूली चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जवळपास ३० वर्षानंतर आमिर आणि रजनीकांत यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. यावर आमिर खानने भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबद्दल झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खानने तो कुली चित्रपटात काम करणार असल्याची बातम्यांना दुजोरा दिला आहे. त्याबद्दल बोलताना आपण चित्रपटाची स्क्रिप्ट न वाचताच या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास होकार दिला. असा खुलासा स्वत आमिर खानने केला आहे. 

दरम्यान, रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट सोन्याच्या तस्करीवर आधारित आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटात श्रुती हासन, रेबा मोनिका जॉन, आणि पूजा हेगडे एका विशेष डान्स नंबरमध्ये झळकणार आहेत. याशिवाय बॉलिवूड स्टार आमिर खान यांचा कॅमिओ रोल फॅन्ससाठी मोठा सरप्राइज ठरेल. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषांमध्ये एकत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: bollywood actor aamir khan confirm cameo in rajnikanth coolie movie says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.