बोल्ड सिनेमांची रेकॉर्डब्रेक कमाई
By Admin | Updated: December 10, 2015 11:05 IST2015-12-10T02:13:12+5:302015-12-10T11:05:00+5:30
काही वर्षांपूर्वी नेहा धूपियाने एक खळबळजनक विधान केले होते. बॉक्स आॅफिसवर दोनच गोष्टी विकतात, एक सेक्स आणि दुसरा शाहरूख खान, असे तिचे म्हणणे होते. या विधानावर तेव्हा बराच गदारोळ झाला होता

बोल्ड सिनेमांची रेकॉर्डब्रेक कमाई
काही वर्षांपूर्वी नेहा धूपियाने एक खळबळजनक विधान केले होते. बॉक्स आॅफिसवर दोनच गोष्टी विकतात, एक सेक्स आणि दुसरा शाहरूख खान, असे तिचे म्हणणे होते. या विधानावर तेव्हा बराच गदारोळ झाला होता, परंतु आज त्या विधानाकडे पाहिले, तर त्यात काही चुकीचे होते, असे वाटत नाही. शाहरूखच्या चित्रपटांच्या यशाबाबत काही बोलायलाच नको आणि बोल्ड चित्रपटांचे विचाराल, तर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हेट स्टोरी ३ या १३ कोटींच्या बजेटवाल्या सिनेमाने तीन दिवसांत तब्बल २८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यावरून नेहाच्या विधानाची सत्यता स्पष्ट होते.
> ‘मर्डर’, ‘जिस्म’, ‘राज’ हा मोठाच पुरावा
महेश भट्ट यांच्या चित्रपटांनीही ही गोष्ट अनेकदा सिद्ध केली. ‘मर्डर’मुळे त्यांना यशाचा नवीन मार्ग पाहायला मिळाला. जवळपास १.५ कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने जेव्हा बॉक्स आफिसवर ३३ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली, तेव्हापासून महेश भट्ट यांची कंपनी, त्यांचा परिवार, त्यांचे सहकारी याच मार्गाने पुढे चालत आहेत. ‘मर्डर’, ‘जिस्म’, ‘राज’ या सिनेमांच्या मालिकेत पडद्यावरचे कलाकार तेवढे बदलत आहेत. बाकी सगळे तेच आहे. स्टोरीलाइनमधली सर्वात मोठी कवायत सेक्सच्या घटनांना फिट करण्यासाठी केली गेली आहे. या बदलावर महेश भट्ट यांना जेव्हा अर्थ, सारांश आणि नावांसारख्या सिनेमांचा उल्लेख केला जातो, तेव्हा ते म्हणाले की, या चित्रपटांचा निर्माता या काळात भुका मरेल, परंतु ‘मर्डर’सारखे चित्रपट त्यांना बाजारात पोजीशन देतील. आता या खेळात टी-सीरिज (ज्यांनी हेट स्टोरी २ आणि आता हेट स्टोरी ३ तयार केले आहे) आणि एकता कपूरची कंपनी बालाजीनेसुद्धा उडी घेतली आहे. प्रेम, सेक्स आणि धोका यावर रागिनी एमएमएसपर्यंत एकताच्या कंपनीचे चित्रपट या गोष्टींची साक्ष देत आहेत. या चित्रपटातून चांगला फायदा झाला आहे. एका अनुमानानुसार, सेक्स ओरिएंटेड चित्रपटांची कमाई खर्चाच्या तीनपट होते. महेश भट्ट यांचे भाऊ मुकेश भट्ट गणित समजावतात. मोठ्या कलाकारांसाठी १०० कोटींचा चित्रपट तयार करण्यात रिस्क मोठी असते, परंतु ५ कोटींच्या बजेटवाल्या आमच्या सिनेमांची कमाई चांगली होते. खर्चाच्या तीनपट अधिक कमाईला ठिकठाक कमाई म्हणणारे मुकेश भट्ट यांचे हे शब्द, नेहा धुपियाच्या शब्दांच्या हकिकतीचा जणू आरसाच आहे.
> काय म्हणतात,
महेश भट्ट?
महेश भट्ट यांच्या एका गोष्टीची आठवण आता येते. ‘हमारी अधुरी कहानी’ (महेश भट्ट कंपनीचा चित्रपट) च्या प्रमोशनसाठी जेव्हा ते ‘लोकमत’ कार्यालयात आले होते, तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला, महेश भट्ट यांच्या रूपात हंसल मेहता यांच्या चित्रपट सिटीलाईटची मार्केटिंग त्यांच्या कंपनीने केली होती आणि त्याच्या प्रमोशनवर ६ कोटींचा खर्च करण्यात आला होता. हा खर्च वसूल करण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. नफा काय मिळतो, परंतु पूजा भट्ट यांनी याच काळात जिस्म २ तयार केला. ज्याचा खर्च पण ६ कोटी होता आणि बॉक्स आॅफिसवर त्याची कमाई ४२ कोटींच्या घरात होती. महेश भट्ट निरागस भावनेने प्रश्न विचारत होते, ‘सांगा, मी आता कशा प्रकारचे सिनेमे तयार करू?’