आरडी बर्मन यांच्या जन्मदिनी गुगलची डुडलच्या माध्यमातून आदरांजली

By Admin | Updated: June 27, 2016 15:56 IST2016-06-27T08:49:32+5:302016-06-27T15:56:54+5:30

प्रतिभेचा महासागर असलेले प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आर.डी.बर्मन यांचा आज जन्म दिवस. २७ जून १९३९ रोजी कोलकाता येथे या महान संगीताकाराचा जन्म झाला.

Birthday by RD Burman, Google delivers respect to the doodles | आरडी बर्मन यांच्या जन्मदिनी गुगलची डुडलच्या माध्यमातून आदरांजली

आरडी बर्मन यांच्या जन्मदिनी गुगलची डुडलच्या माध्यमातून आदरांजली

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २७ - मेरा कुछ सामान, चुरा लिया है तुमने, चिंगारी कोई भडके, ओ मांझी रे, इक लडकी को देखा तो ऐसा लगा... अशी एकाहून एक सरस गाणी देणारे, प्रतिभेचा महासागर असलेले प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आर.डी.बर्मन उर्फ पंचमदा यांचा ७७ वा जन्मदिवस...! त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने अनोखे डूडल साकारत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 
 
२७ जून १९३९ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या या महान संगीतकाराने रसिकांना एकापेक्षा एक सरस गाण्यांची मेजवानी दिली. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एस.डी.बर्मन यांचे सुपुत्र असलेल्या पंचमदांची गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात. शोले, यादो की बारात, मासूम, अमर-प्रेम, आराधना अशा ३०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
आरडींची गाणी ऐकली की, आजही मनाला प्रसन्नता मिळते. त्यांनी संगीतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करुन भारतीय संगीत अधिक समृद्ध केले. आर.डी, आशा भोसले आणि गुलजार या त्रयीची जोडी व गाणी अजरामर आहे.
वयाच्या नवव्या वर्षापासून आरडींनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. १९८३,१९८४ व १९९५ साली त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता. 
४ जानेवारी १९९४ साली त्यांचे निधन झाले.
 
 
 

Web Title: Birthday by RD Burman, Google delivers respect to the doodles