‘लाल इश्क’च्या सेटवर बर्थडेची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 01:06 IST2016-05-14T01:06:52+5:302016-05-14T01:06:52+5:30
संजय लीला भन्साळींची निर्मिती असणाऱ्या ‘लाल इश्क’ या सिनेमाची मराठी चित्रपटनगरीत सध्या मोठी हवा आहे. सध्या अशीच एक चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे

‘लाल इश्क’च्या सेटवर बर्थडेची धमाल
संजय लीला भन्साळींची निर्मिती असणाऱ्या ‘लाल इश्क’ या सिनेमाची मराठी चित्रपटनगरीत सध्या मोठी हवा आहे. सध्या अशीच एक चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे, ती चर्चा म्हणजे, ‘लाल इश्क’च्या सेटवर करण्यात आलेले बर्थडे सेलीब्रेशन! सहनिर्माती शबिना खान यांच्या अखत्यारीत या सिनेमाचे प्रमोशन संपूर्ण महाराष्ट्रात होत असून, या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ‘लाल इश्क’ कुटुंबातील अनेकांचे वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले. यात अभिनेता स्वप्निल जोशी, अंजना सुखानी, शबिना खान, अमित राज या आॅनस्क्रीन मेंबरसोबतच कॅमेरामन तसेच सिनेमाच्या टेक्निशियन टीमचादेखील समावेश आहे. विशेष
म्हणजे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या, तसेच वेषभूषाकार शबिना खान यांनी एक कुटुंबप्रमुख या नात्याने वरील सर्वांच्या वाढदिवसाची विशेष व्यवस्था पहिली असल्याचे समजतेय.
आम्ही सर्व जणांनी चित्रीकरणादरम्यान खूप
मजा केली असल्याचे अभिनेता स्वप्निल जोशीने सांगितले. आमच्या टीममधील अनेक जणांचे बर्थडे आम्ही सेटवरच मोठ्या जल्लोषात साजरे केले असल्याचेदेखील त्याने पुढे सांगितले.