बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:45 IST2025-05-24T14:44:10+5:302025-05-24T14:45:13+5:30

बिपाशाला पाहिलंत का? आता कशी दिसतेय अभिनेत्री

bipasha basu viral video she has out on too much weight netizens trolling her | बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

'ब्लॅक ब्युटी' बिपाशा बासू (Bipasha Basu) सध्या चर्चेत आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. जिमबाहेर येतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तिचं वजन कमालीचं वाढलेलं दिसतंय. बिपाशाला अशा अवस्थेत कोणी ओळखूही शकत नाहीये. तीन वर्षांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला. नंतर तिचं वजन झपाट्याने वाढलं. अजूनही ती वजन घटवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा लेटेस्ट लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकितच झालेत.

प्रेग्नंसीमुळे बिपाशा बासूच्या वजनात कमालीची वाढ झाली होती. २०२२ साली तिने लेकीला जन्म दिला. तिचं नाव देवी असं ठेवण्यात आलं. बिपाशा आणि पती करणसिंह ग्रोवर अनेकदा लेकीसोबतचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या मालदीव ट्रीपचेही फोटो चर्चेत होते. मात्र आता नुकताच बिपाशाचा समोर आलेला लूक पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिममधून बाहेरस निघतानाचा तिचा हा व्हिडिओ आहे. ट्रॅप पँट, टॉप आणि गळ्यात जिम बॅग, हातात बॉटल अशा लूकमध्ये ती दिसत आहे. बिपाशाचा चेहरा एकदम जाड दिसत असून ती एकूणच स्थूल झालेली दिसत आहे. पापाराझींना पाहताच ती वैतागते आणि 'अरे यार' म्हणत लगेच कारमध्ये बसते. नंतर ती चेहराही लपवताना दिसते. 'फिल्मीग्यान' पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


बिपाशाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 'मला तर ही कोकिलाबेन वाटत आहे','मलाही ही ओळखू येत नाहीये का?','एकेकाळची फिटनेस दिवा आज कशी दिसत आहे?' अशा कमेंट्सच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. तर काहींनी बिपाशाची बाजूही घेतली आहे.

बिपाशा बासू शेवटची २०१८ साली 'वेलकम टू न्यूयॉर्क' सिनेमात दिसली. यामध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. सिनेमा फारसा चालला नव्हता. त्याआधी १० वर्षांपूर्वी २०१५ साली ती 'अलोन' सिनेमात मुख्य भूमिकेत होती. सध्या बिपाशा स्क्रीनवरुन गायब आहे.

 

Web Title: bipasha basu viral video she has out on too much weight netizens trolling her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.