नाटकांतील आक्षेपार्ह संवादांवरही ‘बिप’
By Admin | Updated: November 4, 2015 03:31 IST2015-11-04T03:31:19+5:302015-11-04T03:31:19+5:30
बोल्ड नाटके मराठीमध्ये नवीन नाहीत. त्यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. मात्र, कदाचित आता सेन्सॉर बोर्डही बोल्ड नाटकांबाबत थोडेसे सहिष्णू झाले आहे. Its2 अॅग्रेसिव्ह

नाटकांतील आक्षेपार्ह संवादांवरही ‘बिप’
बोल्ड नाटके मराठीमध्ये नवीन नाहीत. त्यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. मात्र, कदाचित आता सेन्सॉर बोर्डही बोल्ड नाटकांबाबत थोडेसे सहिष्णू झाले आहे. Its2 अॅग्रेसिव्ह या बोल्ड युनिसेक्स कॉमेडीतील नाटकात काही आक्षेपार्ह व वादग्रस्त संवाद असतानाही मूळ संहितेला धक्का न लागता काही कट सुचवून आणि आक्षेपार्ह संवादांवर ‘बिप’ देण्यास सांगून या नाटकाला यू प्रमाणपत्र मिळाले आहे.
साई एंटरटेनमेंट मुंबईनिर्मित व निर्माते विष्णू जाधव यांच्या दिग्दर्शक संतोष वाजे दिग्दर्शित ‘Its 2 अॅग्रेसिव्ह’ या नाटकाबाबत हा निर्णय झाला आहे.
नाटकाचा विषय हा बोल्ड आणि स्क्रिप्टमध्ये बरीच आक्षेपार्ह व वादग्रस्त वाक्ये असल्याने सेन्सॉरची कात्री लागणार आणि ‘ए’ प्रमाणपत्र मिळणार, असेच सगळ्यांना वाटत होते; मात्र सेन्सॉरने त्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला. या
निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,
असे जाधव आणि वाजे यांनी सांगितले. पती, पत्नी व त्यांच्या आयुष्यात अचानक आलेली एक कॉलगर्ल यामुळे त्या तिघांच्या
जीवनात होणारी चढाओढ, त्यातून होणारी एक युनिसेक्स कॉमेडी, असे
हे नाटक आहे. वाजे म्हणाले, की विषय बोल्ड आणि सद्य परिस्थितीवर आधारित असल्याने मी सच्चाई दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून सेन्सॉरने २२ कट दिले आहेत. ते मी मान्य केले आहेत; पण सेन्सॉरच्या या निर्णयामुळे मी लिहिलेल्या कथेला कुठेही धक्का पोहोचला नाही. मला जे काही मांडायचे, दाखवायचे आहे ते पे्रक्षकांना नक्की कळेल. जे काही मी व माझ्या कलाकारांनी केले आहे; त्यामुळे रंगमंचाच्या मर्यादांचे उल्लंघन होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. या नाटकात सुनील पगार, अंतरा पाटील आणि विशाखा दरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.