बिजॉयचे 'मंगल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:18 IST2016-01-16T01:06:23+5:302016-02-13T05:18:36+5:30
वजीरच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचा दिग्दर्शक बिजॉय नांबियारने एक महत्त्वाचे काम पूर्ण केले आहे. बिजॉयने त्याची मैत्रिण व अभिनेत्री शीतल ...

बिजॉयचे 'मंगल'
व ीरच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचा दिग्दर्शक बिजॉय नांबियारने एक महत्त्वाचे काम पूर्ण केले आहे. बिजॉयने त्याची मैत्रिण व अभिनेत्री शीतल मेनन हीच्याशी नुकताच विवाह केला. केरळमध्ये झालेला हा विवाहसोहळा मल्याळी परंपरेप्रमाणे झाला. यावेळी शीतल व बिजॉयच्या कुटुंबासह जवळचे नातलग व मित्र उपस्थित होते. बिजॉय व शीतलची पहिली ओळख 'राहू' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
शैतानच्या शूटिंगच्या वेळी दोघांतील प्रेम फुलत गेले. शीतलने डिनो मारियो अभिनित 'भ्रम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यानंतर तिने 'माय नेम इज खान' व बिजॉय दिग्दर्शित 'डेव्हिड' या चित्रपटात काम केले. दोघेही बरेच दिवस रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगण्यात येते. बिजॉयचे हे दुसरे लग्न असून 2007 साली त्याने जुही बब्बरशी विवाह केला होता. 2009 मध्ये दोघांचा काडीमोड झाला. शीतलसोबत ख्रिसमसमध्ये लग्न करणार असल्याचे बिजॉय सांगत होता. अखेर हे लग्न झाले आहे.
![Bijoy]()