'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:17 PM2024-04-23T16:17:51+5:302024-04-23T16:18:25+5:30

गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Bigg Boss Ott 3 Start Date On Jio Cinema Contestants List And More | 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

'बिग बॉस' हा भारतातील टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे 'बिग बॉस'चा मोठा चाहता वर्ग आहे. टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' संपलं की चाहत्यांना आतुरता असते 'बिग बॉस ओटीटी'ची. 'बिग बॉस ओटीटी'चे दोन पर्व चांगलेचं गाजले. आता चाहते 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाची वाट पाहत आहेत.  'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व रद्द झाल्याचं बोललं जात होतं. पण, आता नवीन अपडेटनुसार, 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यात एक ट्विस्ट असणार आहे. 

'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व लवकरचप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याची तारीख देखील समोर आली आहे. 'द खबरी'नेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन सीझन प्रसारित होणार आहे.  'बिग बॉस ओटीटी'चा तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे द्यावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.  येत्या २५ एप्रिल रोजी याची अधिकृत घोषणा होणार असल्याचं 'द खबरी'नं पोस्ट करुन सांगितलं आहे.  या सीझनची पूर्वीपेक्षाही अधिक क्रेझ वाढली आहे.

'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या पर्वाची विजेता ही दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वानं एक इतिहास रचला. पहिल्यांदाच 'बिग बॉस'च्या इतिहासात वाइल्ड कार्ड स्पर्धक विजेता झाला. बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एन्ट्री घेतलेला स्पर्धक एल्विश यादव  'बिग बॉस ओटीटी २' चा विजेता ठरला.  'बिग बॉस सीझन 17' संपल्यानंतर आता बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन चर्चेत आहे. 
 

Web Title: Bigg Boss Ott 3 Start Date On Jio Cinema Contestants List And More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.