विशाल कोटियन आणि ओमकार राऊतनं निवडलं 'मेहनतीचं दार'; रितेश देशमुखनंही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:46 IST2026-01-11T22:45:57+5:302026-01-11T22:46:48+5:30
विशाल कोटियन आणि ओमकार यांचे मंचावर येताच आपल्या खास शैलीत रितेश देशमुखने स्वागत केले.

विशाल कोटियन आणि ओमकार राऊतनं निवडलं 'मेहनतीचं दार'; रितेश देशमुखनंही केलं कौतुक
चाहते ज्या शोची आतुरतेने वाट पाहत होते, तो शो घेऊन महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख आला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. हेअर स्टायलिस्ट आणि फिटनेस आयकॉन ओमकार राऊत आणि लोकप्रिय अभिनेता विशाल कोटियन या दोघांनी मोठ्या दिमाखात 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.
विशाल कोटियन आणि ओमकार यांचे मंचावर येताच आपल्या खास शैलीत रितेश देशमुखने स्वागत केले. 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड प्रीमियरमध्ये प्रत्येक स्पर्धकाला घरात जाताना दोन पर्याय दिले जात आहेत. जेव्हा लोकप्रिय अभिनेता विशाल कोटियन आणि फिटनेस आयकॉन ओमकार राऊत मंचावर आले, तेव्हा त्यांनी केवळ आपल्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर त्यांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांनीही घरात प्रवेश करण्यासाठी 'मेहनतीचं दार' निवडलं आहे.
विशाल कोटियन हा टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते आणि मॉडेल आहे. 'अकबर बिरबल' या मालिकेतील 'बिरबल'च्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यांचे बालपण मुंबईतील 'दगडी चाळ' या परिसरात अत्यंत गरिबीत गेले. विशालने यापूर्वी 'बिग बॉस हिंदी' गाजवले असून, तिथे त्याने आपल्या चतुर रणनीतीने सर्वांना चकित केले होते. मूळचा मराठी मुलगा असलेला विशाल आता आपल्या मातीतील या खेळात कशी बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर ओमकार राऊत केवळ एक उत्तम हेअर स्टायलिस्ट नाही, तर तो तरुणाईसाठी एक फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखला जातो.
'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचं नशीब कसं पालटणार, त्याचबरोबर 'बिग बॉस'च्या घरात हे कलाकार काय गोंधळ घालतायत. हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी ६' दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित करण्यात येणार आहे.