बिग बॉसच्या घरात आजपासून पुन्हा रंगणार नॉमिनेशन नाट्य, कुणावर येणार टांगती तलवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 03:32 PM2018-06-04T15:32:18+5:302018-06-04T15:34:48+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल 49 दिवस राहणारी जुई गडकरी या रविवारी घराबाहेर पडली. तिचं असं घराबाहेर जाणं कुणाला खटकल तर कुणाला बरोबर वाटल.

Bigg Boss Marathi : Nomination round will start today, eyes on Who will nominate? | बिग बॉसच्या घरात आजपासून पुन्हा रंगणार नॉमिनेशन नाट्य, कुणावर येणार टांगती तलवार?

बिग बॉसच्या घरात आजपासून पुन्हा रंगणार नॉमिनेशन नाट्य, कुणावर येणार टांगती तलवार?

googlenewsNext

मुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल 49 दिवस राहणारी जुई गडकरी या रविवारी घराबाहेर पडली. तिचं असं घराबाहेर जाणं कुणाला खटकल तर कुणाला बरोबर वाटल. आता पुढील काही दिवस वेगवेगळी चर्चा बघायला मिळणार.

यासोबतच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रीयेला सुरुवात होणार आहे. काय असणार आजचे नॉमिनेशनचे अप़डेट ? कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सुरक्षित ? कोण कुणाला करणार नॉमिनेट ? हे आज बघायला मिळणार आहे.

आज या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जे चार सदस्य सेफ झोनमध्ये जातील ते चार सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेपासून दूर असतील. मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे चार सदस्य प्रथम त्या सेफ झोनमध्ये जाऊन बसणार आहेत. त्यामुळे या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेला वेगळं वळण येणार आहे. 

जुई घराबाहेर तर गेली पण जाता जाता जुईला एक विशेष अधिकार देण्यात आला. या अधिकारानुसार जुई कोणत्याही एका सदस्याला पुढच्या एका आठवड्यासाठी शिक्षा देऊ शकत होती. या संधीचा फायदा घेत जुईनं सईला पुढील एक आठवडा कॉफी न पिण्याची शिक्षा सुनावली. त्यामुळं सई आता यावर काय बोलणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे महेश मांजरेकरांनी दोन ग्रुप केले आहेत. एका ग्रुपचा कॅप्टन पुष्कर आणि दुसऱ्या ग्रुपची कॅप्टन रेशम यांना केलंय. ज्यामध्ये दोन्ही गटांना एक स्कीट तयार करायचे आहे. जो ग्रुप या टास्कमध्ये जिंकेल त्यांना एक गिफ्ट दिलं जाणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कळेलच कोण हा टास्क पूर्ण करणार आणि कोण जिंकणार.

Web Title: Bigg Boss Marathi : Nomination round will start today, eyes on Who will nominate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.