मिस्टर अँड मिसेस चव्हाण! सूरजनं शेअर केला बायकोसोबतचा रोमँटिक Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:44 IST2025-12-22T14:25:01+5:302025-12-22T14:44:15+5:30
सूरज चव्हाणने बायकोसोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मिस्टर अँड मिसेस चव्हाण! सूरजनं शेअर केला बायकोसोबतचा रोमँटिक Video
'बिग बॉस'मुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात येतात. त्यापैकी एक म्हणजे सूरज चव्हाण. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण सहभागी झाला आणि त्यानं प्रेक्षकांची मने जिंकतं ट्रॉफी उचलली. 'बिग बॉस'नंतर सूरजच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. आधी घर झालं आणि नंतर लग्न झालं. सूरज चव्हाणच्या लग्नाची तर खूप चर्चा झाली. अशातच आता लग्नानंतर सूरज चव्हाणने बायकोसोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पत्नी संजनाच्या पायात सूरज पैंजण घालताना दिसतोय. या व्हिडीओला सूरजनं "माझी कारभारीन" असं कॅप्शन दिलंय. या व्हिडीओमध्ये सूरज आणि संजना खूप आनंदी दिसून येत आहेत. या व्हिडिओला सूरजने 'रुसू नको पाटलाची पाटलीन बाई' हे गाणं लावलं आहे. त्यांचा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सूरज आणि संजना यांच्या या व्हिडीओवर "भारी जोडी", "महाराष्ट्रात भारी सूरज संजनाची जोडी", "खूप छान",अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यांचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.सूरज आणि संजनाचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही त्याच्या मामाचीच मुलगी आहे. सूरजने मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. संजना देखील सूरज सारखीच साधी आहे.