Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:53 IST2025-08-22T13:51:33+5:302025-08-22T13:53:05+5:30
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९' रविवारपासून सुरु होणार आहे. यातील कलाकारांची नावं समोर आली आहेत. ही नावं वाचून तुम्हालाही धक्का बसेल. जाणून घ्या

Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
'बिग बॉस १९'ची सध्या खूप उत्सुकता आहे. तीन दिवसांमध्ये हा शो टीव्हीवर सुरु होणार आहे. सलमान खान पुन्हा एकदा 'बिग बॉस १९'च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. प्रोमोपासूनच 'बिग बॉस १९'ची सर्वांना उत्सुकता आहे. पण 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार याविषयी मात्र सर्वांच्याच मनात प्रश्न आहे. अशातच एका मीडिया रिपोर्टने 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची कन्फर्म यादी टाकली आहे. या यादीतील नावं वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
हे स्पर्धक 'बिग बॉस १९'मध्ये जाणार?
TV9 ने टाकलेल्या रिपोर्टनुसार 'बिग बॉस १९'मध्ये कन्फर्म जाणारे स्पर्धक पुढीलप्रमाणे:- नगमा मिरेजकर, नीलम गिरी, आवेज दरबार, डीनो जेम्स, अश्नूर कौर, नेहल चुदासमा, तानिया मित्तल, शहबाज बादेशा, नटाइला, गौरव खन्ना, बसीर अली, अभिषेक बजाज, अतुल किशन, अमाल मलिक, कुनीचका सदानंद, मृदुल तिवारी आणि झिशान कादरी हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे 'बिग बॉस १९'च्या आधीच्या काही पर्वांप्रमाणे यंदाच्या नव्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टारचा सहभाग असणार नाही. बहुतांश कलाकार हे टीव्ही इंडस्ट्रीतील असणार आहेत.
'बिग बॉस १९'कधी आणि कुठे बघायला मिळणार
'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी जिओहॉटस्टारवर ९ वाजता तर कलर्स टीव्हीवर १०.३० वाजता पाहता येणार आहे. या यादीपैकी कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सलमान खान पुन्हा एकदा 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याशिवाय यंदाच्या सीझनमध्ये सलमान खानसोबतच आणखी दोन-तीन बडे स्टार्सही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत.