बिग बी रडले

By Admin | Updated: May 28, 2015 23:31 IST2015-05-28T23:31:27+5:302015-05-28T23:31:27+5:30

बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन हे चित्रपटातून प्रेक्षकांना रडवत आले आहेत. पण एक चित्रपट पाहून ते स्वत: रडले. एवढेच नाही, तर मी रडलो असे त्यांनी चक्क जगजाहीर केले!

Big B Rudley | बिग बी रडले

बिग बी रडले

बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन हे चित्रपटातून प्रेक्षकांना रडवत आले आहेत. पण एक चित्रपट पाहून ते स्वत: रडले. एवढेच नाही, तर मी रडलो असे त्यांनी चक्क जगजाहीर केले! या रडण्यामागे होती कंगना राणावत. तिच्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटातील अभिनय पाहून बीग बी यांनाही अश्रू आवरले नाहीत. याबद्दल त्यांनी कंगनाला पत्र लिहून म्हटले आहे की, ‘एखादा परफॉर्मन्स पाहून डोळ्यांत पाणी येतं, असं फारकमी वेळा होतं. तनूच्या रूपात तू मला रडवलंस आणि मला माहीत नाही की तनूसारखी दिसणारी दत्तो कोण आहे? पण ती भेटली तर माझ्याकडून तिला शुभेच्छा दे.’ त्यांच्या या पत्रामुळे कंगना भारावली नसेल तर नवलच!

Web Title: Big B Rudley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.