'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत राधा आणि पिंगा गर्ल्सना वेगळं करण्याचा भुतेंचा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:06 IST2025-05-28T17:06:18+5:302025-05-28T17:06:48+5:30
Pinga Ga Pori Pinga series : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक भावनिक आणि रहस्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत राधा आणि पिंगा गर्ल्सना वेगळं करण्याचा भुतेंचा प्लान
कलर्स मराठीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga series) मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक भावनिक आणि रहस्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे. राधा अचानक गायब झाल्यामुळे पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यातच या घटनेमागे भुते असल्याचे संकेत त्यांना मिळणार का? राधा कुठे आहे, कोणाकडे आहे, आणि का नेण्यात आली आहे, हे एक मोठं रहस्य पिंगा गर्ल्ससमोर बनलं आहे.
राधाच्या येण्याने घरात नवंचैतन्य आले होते, सगळ्यांची ती लाडकी बनली होती. पण, अचानक तेजाला अनभिज्ञ दोघांनी येऊन सांगितले आम्ही तिचे आई बाबा आहोत आणि तेजाने विश्वास ठेवला. इतकेच नसून त्यांच्यासोबत राधाला ते घेऊन देखील गेले. पण ज्यांच्यासोबत राधा गेली, ते खरोखरच तिचे आई बाबा आहेत का? हा प्रश्न तेजाला पिंगा गर्ल्स विचारतात. राधाचे हे अपहरण तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच या घटनेमागे भुते असल्याचे संकेत त्यांना मिळणार का? राधा कुठे आहे, कोणाकडे आहे, आणि का नेण्यात आली आहे, हे एक मोठं रहस्य पिंगा गर्ल्ससमोर बनलं आहे.
या सगळ्या प्रसंगामुळे तेजा आणि पिंगा गर्ल्समध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. मात्र पिंगा गर्ल्स यांच्यातील नातं केवळ मैत्रीपुरतं मर्यादित नाही, तर ते एकमेकांसाठी झगडण्याचं, संकटात साथ देण्याचं नातं आहे. आणि म्हणूनच आता त्या मिळून राधाचा शोध घेणार आहेत. आता सर्वांचं लक्ष आहे की, पिंगा गर्ल्स ही अडचण कशी पार करणार? राधाला वाचवण्यात त्या यशस्वी होणार का? नात्यांची गुंतागुंतं, जबाबदारीची जाणीव, आणि नाजूक भावनांचे अनेक थर उलगडणार आहेत.