"देवाचे आभार की, मला मुलगी नाही", भारती सिंग असं का म्हणाली? दोन मुलांची आहे आई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:03 IST2026-01-13T18:55:28+5:302026-01-13T19:03:00+5:30
लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे.

"देवाचे आभार की, मला मुलगी नाही", भारती सिंग असं का म्हणाली? दोन मुलांची आहे आई!
कॉमेडी क्वीन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. भारतीने १९ डिसेंबरला दुसऱ्या बाळाला जन्म दिला. भारतीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. भारती आता दोन मुलांची आई झाली आहे. पण, भारती सिंगला नेहमीच एक मुलगी हवी होती, हे तिने अनेकदा बोलून दाखवलं आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये भारती चक्क "देवाचे लाख लाख आभार की, मला मुलगी नाही" असं म्हणताना दिसत आहे. पण, असं बोलण्यामागचं तिचं कारण अत्यंत भावनिक आहे.
भारती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका ताज्या व्लॉगमध्ये भारतीने एक असा प्रसंग सांगितला. तिचा ३ वर्षांचा मुलगा गोला गमतीने तिला म्हणाला की, "मी घर सोडून जात आहे आणि तू माझी बॅग भरून दे". आपल्या चिमुकल्या मुलाच्या तोंडून 'घर सोडण्याचे' हे शब्द ऐकताच भारती प्रचंड भावुक झाली. जरी गोला हे गमतीने बोलत होता, तरीही तिला वाईट वाटलं. यावर तिने तातडीने गोलाला जवळ घेतलं आणि रडत रडत त्याला समजावून सांगितलं की, "अशा गोष्टी कधीच बोलायच्या नाहीत".
यावेळी भारती म्हणाली, "देवाचे लाख लाख आभार की, मला मुलगी नाही. तिला मोठं करणं, तिचं संगोपन करणं आणि एक दिवस तिचं लग्न करून तिला दुसऱ्याच्या घरी पाठवणं... हे दुःख मी सहनच करू शकले नसते. गोलो फक्त गमतीने म्हणाला की मी निघून जाईन, तरीही मला इतकं वाईट वाटतंय. धन्य आहेत ते आई-वडील ज्यांना मुली आहेत. जे आपल्या काळजावर दगड ठेवून मुलींना शिकवतात आणि त्यांचं लग्न करून त्यांना सासरी पाठवतात".