बेबो म्हणतेय, शाहिद उत्तम कलाकार!
By Admin | Updated: April 24, 2016 01:47 IST2016-04-24T01:47:56+5:302016-04-24T01:47:56+5:30
करिना कपूर खान आणि शाहीद कपूर यांनी ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे, पण त्यांना एकही सीन एकत्र मिळाला नाही. ‘उडता पंजाब’ च्या ट्रेलर लाँचिंगवेळी

बेबो म्हणतेय, शाहिद उत्तम कलाकार!
करिना कपूर खान आणि शाहीद कपूर यांनी ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे, पण त्यांना एकही सीन एकत्र मिळाला नाही. ‘उडता पंजाब’ च्या ट्रेलर लाँचिंगवेळी ते दोघे स्टेजवर एकत्र आले. जवळपास दहा वर्षांनंतर ते एखाद्या चित्रपटासाठी एकत्र आले असतील. त्यांचे फॅन्स आणि माध्यमांनीही या गोष्टीची नोंद घेतली. या स्टेजवर दोघेही खुप अस्वस्थ होते. पण तरीही ते त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटत आहेत. त्या दोघांनाही खुप प्रेम करणारे लाईफ पार्टनर मिळाले आहेत. ट्रेलर लाँचिंगवेळी करिनाला विचारण्यात आले की, ‘ तुला शाहीदसोबत पुन्हा काम करायला आवडेल का?
तेव्हा ती म्हणते,‘ हो नक्कीच. शाहीद एक उत्तम अभिनेता आहे. ‘जब वी मेट’ ची डिव्हीडी माझ्यासोबत नेहमीच असते. एकमेकांना डेट करणारे कपल एकमेकांसोबत एका चित्रपटात काम करत
नाहीत हा कन्सेप्ट आता जुना झाला आहे. आपण कलाकार आहोत आणि प्रोफेशनल असल्याने आपल्या भावना करिअरमध्ये
का याव्यात?