'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीचं साऊथमध्ये पदार्पण! 'या' सुपरस्टारसोबत करणार काम, पहिली झलक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:40 IST2025-07-03T10:38:19+5:302025-07-03T10:40:26+5:30
'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीची नवी इनिंग, दिसणार नव्या भूमिकेत; सोबतीला आहे 'हा' दाक्षिणात्य अभिनेता

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीचं साऊथमध्ये पदार्पण! 'या' सुपरस्टारसोबत करणार काम, पहिली झलक समोर
Harshaali Malhotra New Film: कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटात सलमान खान आणि करीना कपूरची मुख्य भूमिका होती.या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून बालकलाकार हर्षाली मल्होत्राने (Harshaali Malhotra) प्रेक्षकांची मनं जिंकली. निरागस चेहरा आणि स्मित हास्याने अनेकांनी भुरळ घालणारी हर्षाली आता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, हर्षाली मल्होत्राच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच अनेक समीक्षकांनी चित्रपटाची स्तुती केली. त्यानंतर आता हर्षालीने दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. "अखंडा-२" असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात ती जननीची भूमिका साकारताना दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेते नंदमुरी बालकृष्ण हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकताच या हर्षालीचा चित्रपटातील पहिला लूक नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर हर्षालीने तिच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे.
'अखंडा-२' च्या घोषणेनंतर, हर्षाली मल्होत्रा चर्चेत आली आहे. बजरंगी भाईजान नंतर, आता हर्षाली या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच येत्या २५ सप्टेंबर २०२५ रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हर्षाली मल्होत्रा जवळपास १० वर्षानंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करते आहे.