बजरंग भाईजानचे पेंडन्ट ऑनलाइन
By Admin | Updated: June 1, 2015 17:07 IST2015-06-01T17:07:54+5:302015-06-01T17:07:54+5:30
बॉलिवूडमध्ये दबंग खान म्हणून ओळखला जाणा-या सलमान खानच्या बजरंग भाईजान या आगामी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. या ट्रेलरला ४८ तासात मोठ्या जवऴजवळ दोन दशलक्षपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत.

बजरंग भाईजानचे पेंडन्ट ऑनलाइन
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०१ - बॉलिवूडमध्ये दबंग खान म्हणून ओळखला जाणा-या सलमान खानच्या बजरंग भाईजान या आगामी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. या ट्रेलरला ४८ तासात मोठ्या जवऴजवळ दोन दशलक्षपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेले सलमानच्या गऴ्यातील पेंडन्ट आकर्षित करणारे आहे. या चित्रपटात सलमान बजरंगबली हनुमानचा भक्त असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या गळ्यात बजरंगबली हनुमानचे शस्त्र असलेले गदा हे पेंडन्ट दाखविण्यात आले आहे. तसेच सलमानच्या चाहत्यांसाठी एक खूश खबर असून त्यांना तशाप्रकारचेच पेंडन्ट ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. कुबेरबॉक्स या एका ज्वेलरीच्या दुकानात अशाचप्रकारचे पेंडन्ट तयार करण्यात आले असून या पेंडन्टमध्ये सोने आणि डायमंडचा वापर करण्यात आला आहे. यासाठी एकूण ०.८५ कॅरेटचे १७ डायमंड्स आणि १८ कॅरेटचे ८.९३ ग्रॅमचे सोने वापरण्यात आले आहे. बजरंग भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून यामध्ये सलमान खान याच्याबरोबरच अभिनेत्री करिना कपूर आणि नवाझुद्दीन सिद्दिकी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन येत्या १७ जुलैला होणार आहे.