'पती पत्नी और वो' च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:07 IST2025-07-02T14:03:06+5:302025-07-02T14:07:46+5:30
'पती पत्नी और वो'च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? दिसणार नवे चेहरे

'पती पत्नी और वो' च्या सीक्वलमधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याच्या नावाची चर्चा
Pati Patni Aur Woh Sequal: बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांच्या रिमेकचाही ट्रेंड सुरु झाला आहे. त्याला प्रेक्षकांची उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच १९७८ साली प्रदर्शित झालेला पती पत्नी और वो हा चित्रपट प्रचंड गाजला होता. जवळपास ४० वर्षानंतर या चित्रपटाचा रिमेक २०१९ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि अनन्या पांडेची प्रमुख भूमिकेत होते. 'पती पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये जुन्याच कथेला मॉडर्न टच देत मनोरंजक बनवण्यात दिग्दर्शक मुदस्सर अजीज यशस्वी ठरले. अशातच मागील काही दिवसांपासून हा चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची चर्चा सुरु होती. त्याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
पती पत्नी और वो मधून चिंटू त्यागीच्या भूमिकेतून कार्तिक आर्यनने रसिकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवली आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय, चित्रपटात कृती सॅननचा कॅमिओ होता आणि राजपाल यादव, अपारशक्ती खुराणा, सनी सिंग, डेझी बोपन्ना आणि दिया मिर्झा यांसारख्या कलाकारांनीही उत्तम काम केलं. त्यानंतर लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, या सीक्वलमध्ये निर्मात्यांनी मोठा बदल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पती पत्नी और वो च्या सीक्वलमध्ये कार्तिक, भूमी आणि अनन्याच्या जागी आता नवे चेहरे दिसणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या जागी आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि सारा अली खानची वर्णी लागल्याची माहिती मिळते आहे.
'पती पत्नी और वो २' या रोमकॉम चित्रपटामध्ये पत्नीची भूमिका वामिका गब्बी साकारणार आहे आणि सारा अली खान प्रेयसीची भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सारा आणि वामिका या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आयुष्मान खुरानासोबत एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील.