अवधूत झाला प्रेम दिवाना!
By Admin | Updated: May 21, 2015 23:13 IST2015-05-21T23:13:44+5:302015-05-21T23:13:44+5:30
सुखी संसारात रममाण असलेला हा पठ्ठ्या कोणाच्या प्रेमात पडलाय? कोल्हापूरचा हा गडी चक्क ‘पीकू’चा प्रेमवेडा झालाय.

अवधूत झाला प्रेम दिवाना!
गायक, संगीतकार आणि आता दिग्दर्शक सर्वांचा लाडका अवधूत गुप्ते पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? सुखी संसारात रममाण असलेला हा पठ्ठ्या कोणाच्या प्रेमात पडलाय? कोल्हापूरचा हा गडी चक्क ‘पीकू’चा प्रेमवेडा झालाय. आपल्या बहारदार अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या प्रेमातच पडल्याचे सोशल साइटवर त्याने जगजाहीर केले आहे.