बॉलीवूडमधील सावत्र नात्यांची सत्यता
By Admin | Updated: December 17, 2015 01:37 IST2015-12-17T01:37:52+5:302015-12-17T01:37:52+5:30
सावत्र हा शब्द आपल्या समाजात चांगला मानला जात नाही. मात्र बॉलीवूडमध्ये सावत्र हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. बॉलीवूडमधील अनेक कुटुंबात सावत्र नात्यांच्या

बॉलीवूडमधील सावत्र नात्यांची सत्यता
सावत्र हा शब्द आपल्या समाजात चांगला मानला जात नाही. मात्र बॉलीवूडमध्ये सावत्र हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. बॉलीवूडमधील अनेक कुटुंबात सावत्र नात्यांच्या कथा आहेत. काही नाते सहज आहे तर काही ठिकाणी मात्र ही सहजता दिसत नाही.
देओल कुटुंबात हा विषय त्यांना खटकत असतो. धमेंद्रच्या पहिल्या पत्नीपासून झालेले सनी व बॉबी देओल कधीच हेमा मालिनी किंवा तिच्या मुलींसोबत एकत्र दिसले नाहीत. इशा व आहना यांच्या लग्नात देखील सनी व बॉबी उपस्थित नव्हते. इशा व आहना यांना मुले झाली आहेत. मात्र तरी देखील सनी व बॉबी यांना त्यांच्यासोबत कुणीच पाहिले नाही.
महेश भट्टला देखील किरण व सोनी राजदान अशा दोन बायका आहेत. किरणची मुलगी पूजा व सोनी राजदानची मुलगी आलिया या दोघी अनेकदा सोबत दिसतात. पूजा व आलिया यांची जवळीक आहेच. आलियाचा सावत्र भाऊ राहुल (किरणचा मुलगा) याच्याशी देखील त्यांची चांगली पटते. भट्ट कुटुंबात सख्खा, सावत्र असा काहीच भेदभाव नाही. त्यांच्यातील नाते सामान्य आहे.
याच प्रमाणे बोनी कपूर यांच्या कुटुंबातही सावत्र नात्यांत सहजता दिसून येते. बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीपासून झालेला अर्जुन कपूर व श्रीदेवीच्या मुली खुशी व जान्हवी यांच्यात कधीच अंतर आले नाही. श्रीदेवीदेखील अर्जुनसोबत दिसते. आपल्या सावत्र बहिणीची प्रशंसा अर्जुन खुल्या दिलाने करीत
असतो. आमिर खानची पहिली
पत्नी रिनाची मुलगी ईराबद्दल
असे सांगितले जाते की तिला
किरण रावचा मुलगा आजादसोबत काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र ती आजादसोबत सार्वजनिक स्थळी एकत्र दिसली नाही. रिना व किरण या दोधी एकत्र दिसल्या आहेत. किरण व रिना यांच्यात चांगले संबध आहेत.
राज बब्बरचा मुलगा आर्यन व स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक यांच्यातील संबध मात्र चांगले नाहीत, असे सांगितले जाते. राज बब्बरने दोन्ही भावात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. आर्यन व प्रतीक यांचे अजिबात पटत नाही. तर आर्यनची बहीन जुही हिच्याशी प्रतीकची चांगली ट्युनिंग आहे.
विनोद खन्नाचा मोठा मुलगा राहुल व अक्षय हे सिनेमात हिरो झालेत. आता विनोदच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा साक्षी सिनेमात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र साक्षीच्या विषयावर अक्षय सहज नाही. सावत्र भावांच्या लिस्टमध्ये अरशद वारसी व अनवर यांचेही नाव घेता येते. यासोबतच रोहित शेट्टी व हृदय शेट्टी हे दोन्ही सावत्र भाऊ दिग्दर्शक असले तरी देखील एकत्र दिसत नाहीत.
- anuj.alankar@lokmat.com