प्रेक्षकांची लाडकी मालिका 'साराभाई' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ?

By Admin | Updated: July 1, 2016 14:42 IST2016-07-01T14:17:08+5:302016-07-01T14:42:02+5:30

स्टार वन वाहिनीवरील ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेचा तब्ब्ल दहा वर्षानंतर सिक्वेल येण्याची शक्यता आहे

Audiences' Ladies Series' Sarabhai 'again audiences? | प्रेक्षकांची लाडकी मालिका 'साराभाई' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ?

प्रेक्षकांची लाडकी मालिका 'साराभाई' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ?

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 01 - स्टार वन वाहिनीवरील ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेचा तब्ब्ल दहा वर्षानंतर सिक्वेल येण्याची शक्यता आहे. 2004मध्ये प्रसारित करण्यात आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांनी मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळत असतानादेखील अवघ्या 69 एपिसोड्सनंतर 10 मार्च 2006 ला मालिका बंद करण्यात आली होती. 
 
नुकतंच मालिकेत इंद्रवर्धनची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांच्या घरी सर्व कलाकार एकत्र जमले होते. सतीश शाह यांच्यासोबत मालिकेत मुख्य भुमिका साकारणारे रत्ना पाठक-शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली, राजेशकुमार तसंच निर्माते जमनादास मजेठिया, आतिश कपाडिया आणि अभिनेते नसरुद्दीन शाहदेखील उपस्थित होते. 
 
दिग्दर्शक जमनादास मजेठिया यांनी ट्विटरवर सर्व कलाकारांचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना सोबतच साराभाईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असल्याचं म्हटलं आहे. ही गुड न्यूज म्हणजे मालिकेचा सिक्वेल असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Audiences' Ladies Series' Sarabhai 'again audiences?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.