‘जय हरी विठ्ठल, अल्लाह् हू अकबर’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती
By Admin | Updated: July 30, 2016 04:07 IST2016-07-30T04:07:38+5:302016-07-30T04:07:38+5:30
काही दिवसांपूर्वीच पंढरपूरची वारी आणि रमजान ईद हे दोन्ही सण प्रेमाचे व बंधुभावाचे नाते जपत आनंदाने साजरे करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लीम ऐक्याचा अनोखा

‘जय हरी विठ्ठल, अल्लाह् हू अकबर’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती
काही दिवसांपूर्वीच पंढरपूरची वारी आणि रमजान ईद हे दोन्ही सण प्रेमाचे व बंधुभावाचे नाते जपत आनंदाने साजरे करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लीम ऐक्याचा अनोखा मिलाफ दाखविणारे ‘डिस्को सन्या’ चित्रपटातील ‘जय हरी विठ्ठल, अल्लाह् हू अकबर’ या गाण्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. या गाण्यात लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांनी त्यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला साद घातली आहे. तर दुसरीकडे, संगीतातल्या अंतरंगात जाऊन बॉलीवूडचे गायक शबाब साबरी यांनी अल्लाह्ला पुकारले आहे. शबाब यांचा सुफी सरगममधला आवाज प्रेक्षकांना खूपच आवडतोय. विशेष म्हणजे, सलमान खानच्या चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणे गाणारे गायक शबाब साबरी या गाण्याद्वारे प्रथमच मराठीत गात आहेत. त्याचबरोबर, प्रत्येकाच्या मनात रुजणारे हे गाणे एकदम धमाकेदार असून, प्रेक्षकांच्या ओठी रुळणारे आहे. या गाण्यातील काळजाचा ठाव घेणारे शब्द चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी लिहिलेले असून, संगीतकार व निर्माते सचिन पुरोहित-अभिजित कवठाळकर यांच्या वकाव् फिल्म्सनिर्मित हा चित्रपट आहे. हा चित्रपट ५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.