अबब...लुलियाचेही सिक्स पॅक्स...!
By Admin | Updated: May 15, 2016 00:56 IST2016-05-15T00:56:18+5:302016-05-15T00:56:18+5:30
सलमान खान आणि लुलिया वंतुर हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये गरम असताना त्यांनी त्यांच्या प्रेममय आयुष्यात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरवले आहे.

अबब...लुलियाचेही सिक्स पॅक्स...!
सलमान खान आणि लुलिया वंतुर हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये गरम असताना त्यांनी त्यांच्या प्रेममय आयुष्यात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरवले आहे. कालच एअरपोर्टवर लुलिया सलमानची आई सलमा सोबत हातात हात घेऊन बाहेर पडताना दिसली. म्हणजे आता ती सलमानसोबत लग्न करण्यासाठी घरच्यांच्या मनापर्यंत पोहोचली असल्याचे कळते आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रिती आणि जेनच्या रिसेप्शनवेळी ते दोघे ‘अॅज अ कपल’ म्हणून गेले होते. वेल, गुड लुलिया... बरं, सलमानने ‘सुल्तान’ चित्रपटासाठी सिक्स पॅक्स बनवले असल्याने आता त्याची लेडीलव्ह लुलियानेही सिक्स पॅक्स बनवले आहेत म्हणे. हे पॅक्स पनवेल येथील अर्पिता फार्म येथील जीममध्ये तिने बनवले आहेत. असेही कळाले आहे की, सलमान खान त्याच्या फिटनेस टिप्स तिच्यासोबत शेअर करत असल्याचे देखील कळाले आहे.