अतुल बनणार प्रतापराव गुजर
By Admin | Updated: October 31, 2014 23:52 IST2014-10-31T23:52:35+5:302014-10-31T23:52:35+5:30
नव्या वर्षाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने चाळण्याचा प्रयत्न मराठी सिनेसृष्टीकडून केला जाणार आहे.

अतुल बनणार प्रतापराव गुजर
नव्या वर्षाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने चाळण्याचा प्रयत्न मराठी सिनेसृष्टीकडून केला जाणार आहे. ‘सात‘ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा सहका:यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा मांडली जाणार आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी या चित्रपटात प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे. बहलोल खानाला अद्दल घडविण्यासाठी प्रतापराव गुजर, विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव अत्रे, सिद्धी हिलाल, दिपाजी राऊतराव आणि कृष्णाजी भास्कर यांचा पराक्रम आणि बलिदान यातून मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.