Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 21:01 IST2025-10-20T20:41:40+5:302025-10-20T21:01:59+5:30
Veteran Actor Asrani Passes Away: फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
मुंबई - बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि कॉमेडिअन असरानी (Asrani) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र २० ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता उपचारादरम्यान त्यांचे प्राण गेले. असरानी ८४ वर्षांचे होते.
फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असं त्यांनी सांगितले.
Actor-director Govardhan Asrani, popularly known as 'Asrani' passed away in Mumbai today after a prolonged illness. His last rites were performed at Santacruz Crematorium.
— ANI (@ANI) October 20, 2025
Pictures from the Crematorium where his family gathered for the last rites. pic.twitter.com/hDzUTmRI7l
शोले या सिनेमातून असरानी यांनी केलेली जेलरची भूमिका अनेकांच्या आजही स्मरणात आहे. “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १९७२ ते १९९१ या काळात सुमारे २५ चित्रपटांमध्ये असरानी यांनी काम केले. भागम भाग, हेरा फेरी, छुपके छुपके यासारख्या सिनेमात त्यांनी विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली होती. ते सहजपणे मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका किंवा विनोदी भूमिका साकारत होते.
१९६७ साली ‘Hare Kanch Ki Chooriyan’ या चित्रपटातून असरानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या पहिल्या काही भूमिका गंभीर स्वरूपाच्या होत्या, मात्र पुढे त्यांनी विनोदी अभिनयात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. ५ दशकांहून अधिक काळात असरानी यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. असरानी यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी ‘Chala Murari Hero Banne’ हा विनोदी चित्रपट स्वतः दिग्दर्शित करून प्रमुख भूमिका साकारली होती. असरानी हे "सिच्युएशनल कॉमेडी"चे मास्टर मानले जात होते. त्यांचा आवाज, संवादफेक आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे ते प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप पाडत होते.