Happy Birthday Asin :आमिर आणि सलमानसोबत 100 कोटींचे सिनेमा केल्यानंतर अभिनेत्री असीनने केला बॉलिवूडला रामराम

By गीतांजली | Published: October 26, 2020 12:17 PM2020-10-26T12:17:37+5:302020-10-26T12:30:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री असीन आज आपला वाढदिवस साजरा करते आहे.

Asin birthday special she left film industry after success so many hit films | Happy Birthday Asin :आमिर आणि सलमानसोबत 100 कोटींचे सिनेमा केल्यानंतर अभिनेत्री असीनने केला बॉलिवूडला रामराम

Happy Birthday Asin :आमिर आणि सलमानसोबत 100 कोटींचे सिनेमा केल्यानंतर अभिनेत्री असीनने केला बॉलिवूडला रामराम

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री असीन आज आपला वाढदिवस साजरा करते आहे.  क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असीनला ओळखले जाते.  असीनने आमिर खानसोबत बॉलिवूडमध्ये एंट्रीमध्ये केली. गजिनी सिनेमाने 100 कोटींची कमाई केली.  या चित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली.

असिनने अक्षयसोबत हाऊसफुल २, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.  मात्र काही सिनेमांनंतर तिने फिल्म इंडस्ट्रिमधून एक्झिट घेतली आहे. 28 ऑक्टोबर 1985 साली केरळमध्ये तिचा जन्म झाला. असीनने आपल्या  कारकिर्दीत तमिळ, हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. तिने तीनवेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला. 

2009 साली असिननेसलमान खानसोबत 'लंडन ड्रिम्ज'मध्ये काम केले. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर फारशी आपली कमाल दाखवू शकला नाही. यानंतर रेडीमध्ये असीन आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा दिसली. रेडीने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला. असीन 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला.

असीन आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटातून केली. 19 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकत असीनने सगळ्यांना आश्चर्याया धक्का दिला होता. असीनने आधी राहुलसोबत चर्च मध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. लग्नानंतर असिनने सिनेमात काम करणं बंद केले. 

Web Title: Asin birthday special she left film industry after success so many hit films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.