अशोक सराफ यांचे कमबॅक
By Admin | Updated: April 14, 2017 04:05 IST2017-04-14T04:05:40+5:302017-04-14T04:05:40+5:30
अशोक सराफ गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण, आता अशोक सराफ अनेक

अशोक सराफ यांचे कमबॅक
- उडती खबर
अशोक सराफ गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण, आता अशोक सराफ अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना एका चित्रपटात दिसणार आहेत. पोस्टर गर्ल, पोस्टर बॉइज यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक समीर पाटील पोलिसांच्या आयुष्यावर सेंटिमेंटल नावाचा चित्रपट बनवत असून, या चित्रपटात अशोक सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात ते पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा त्यांना अतिशय आवडल्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे
कळतेय.