अश्मितची मराठीत एन्ट्री
By Admin | Updated: May 1, 2015 00:05 IST2015-05-01T00:05:06+5:302015-05-01T00:05:06+5:30
अभिनेता अश्मित पटेल याने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक थ्रीलर नाइट’ या नव्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला.

अश्मितची मराठीत एन्ट्री
अभिनेता अश्मित पटेल याने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक थ्रीलर नाइट’ या नव्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. सद्य:स्थितीतील तरुणाईवर प्रकाशझोत टाकणारा हा रहस्यमय थरारपट असून या चित्रपटात अश्मितसोबत केतन पेंडसे, निखिल वैरागर, संस्कृती बालगुडे, खुशबू तावडे, तितिक्षा तावडे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन, पटकथा प्रदीप मेस्त्री यांची आहे.