अॅश म्हणते, सॉरी.. नो किसींग सीन
By Admin | Updated: December 29, 2015 14:25 IST2015-12-29T13:43:12+5:302015-12-29T14:25:51+5:30
संजय गुप्ताच्या 'जजबा'मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणा-या ऐश्वर्या रायने रणबीर कपूरसोबत लीपलॉक म्हणजे चुंबन दुश्याचा सीन करायला नकार दिला आहे.

अॅश म्हणते, सॉरी.. नो किसींग सीन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - संजय गुप्ताच्या 'जजबा'मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणा-या ऐश्वर्या रायने रणबीर कपूरसोबत लीपलॉक म्हणजे चुंबन दुश्याचा सीन करायला नकार दिला आहे. करण जोहरच्या आगामी 'ए दिल है मुश्किल'मध्ये ऐश्वर्या आणि रणबीरची मुख्य भूमिका आहे.
या चित्रपटात रणबीर-ऐश्वर्याचा किसींग सीन कथानकाची गरज होती. अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाल्यानंतर ऐश्वर्याने हृतिक रोशनबरोबर किसींग सीन दिला होता. आता मात्र तिने अशा दृश्याला नकार दिला आहे.
ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून आहे. त्यामुळे करणही या दृश्यासाठी ऐश्वर्याच्या मागे लागला नाही. करणने आता हा सीन ऐश्वर्याचा प्रत्यक्ष सहभाग न घेता वेगळया पद्धतीने चित्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.