भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:45 IST2025-11-10T13:44:31+5:302025-11-10T13:45:23+5:30
सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.

भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
हिंदीत '१९२०' या हॉरर सिनेमाने सर्वांना घाबरवून सोडलं होतं. आत मराठीतही असाच काहीसा प्रयोग असलेला थरारक सिनेमा येत आहे. सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'असंभव' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. भूतकाळातील रहस्य, वर्तमानात पडणारं स्वप्न, अनेक प्रश्न असा थरार सिनेमात पाहायला मिळणार आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.
दोन मिनीट ४२ सेकंदांच्या हा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासून खिळवून ठेवतो. सचित पाटील, प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांचा लव्हट्रँगल दिसत आहे. प्रिया बापट मानसी या ग्लॅमरस भूमिकेत दिसत आहे. तर मुक्ता बर्वेची उर्मिला ही भूमिका आहे. एक मोठी हवेली आणि तिथे घडणाऱ्या अनेक काल्पनिक घटना ज्या हारवणाऱ्या आहेत. भूतकाळातील गूढ आणि वर्तमानात घडणाऱ्या थरारक घटना ट्रेलरमध्ये दिसत आहेत. मुक्ता बर्वेला हवेलीचं पडणारं स्वप्न, नात्यांतील गुंतागुंत, अनेक प्रश्न आणि शेवटी हत्या असा एक थरार सिनेमात पाहायला मिळणार आहे.
'मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट'चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर शर्मिष्ठा राऊत (एरिकॉन टेलिफिल्म्स), तेजस देसाई, मंगेश परुळेकर (पी अँड पी एंटरटेनमेंट) आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांची गुंतागुंत असलेला हा थरारक चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.