आजही वडिलांची परवानगी घेऊन 'हा' अभिनेता देतो किसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:45 IST2022-07-27T13:45:14+5:302022-07-27T13:45:47+5:30

Arvind akela kallu: कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक असून इन्स्टाग्रामवर त्याचे जवळपास १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

arvind akela kallu does liplock scene with father permission | आजही वडिलांची परवानगी घेऊन 'हा' अभिनेता देतो किसिंग सीन

आजही वडिलांची परवानगी घेऊन 'हा' अभिनेता देतो किसिंग सीन

एखाद्या चित्रपटात बोल्ड सीन असणं किंवा किसिंग सीन असणं हे आजकालच्या काळात सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अनेक चित्रपटांमध्ये कलाकार बिंधास्तपणे असे सीन देतात. यात सर्वात जास्त किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेता इम्रान हाश्मी याला तर सिरिअल किसर असं नावंही ठेवण्यात आलं आहे. परंतु, या कलाविश्वात असाही एक अभिनेता आहे जो आजही वडिलांच्या परवानगीशिवाय चित्रपटात एकही किसिंग सीन देत नाही.
सध्या सोशल मीडियावर भोजपुरी अभिनेता अरविंद अकेला कल्लू (Arvind Akela Kallu) याची चर्चा रंगली आहे. अरविंद अकेला हा भोजपुरी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक असून इन्स्टाग्रामवर त्याचे जवळपास १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.विशेष म्हणजे लोकप्रिय असलेला हा अभिनेता आजही चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यापूर्वी आपल्या वडिलांची परवानगी घेतो.

उत्तम गायकीमुळे प्रसिद्ध असलेला अरविंद अकेला कल्लू याने २०१६ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिलदार सजना हा त्याचा पहिला चित्रपट असून त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, आजही कोणत्या चित्रपटात किसिंग सीन असेल तर तो वडिलांची परवानगी घेतो असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

"माझ्या वडिलांना मुळात कोणतीच तक्रार नाही. पण, मी त्यांना माझा आदर्श मानतो. त्यांनीच मला गायक वा अभिनेता होण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे मी कायम चित्रपट साईन करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतो. जर माझ्या वडिलांनी होकार दिला तरच मी तो चित्रपट करेन, असं मी मेकर्सला थेट सांगतो", असं अरविंद अकेला कल्लू म्हणाला.

दरम्यान, अरविंद अकेला कल्लू यांचं असं नाव असण्यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अरविंद यांचं टोपणनाव कल्लू आहे आणि ते लहानपणी सतत एकटे राहायचे त्यामुळे लोकांनी त्यांचं नाव अरविंद अकेला असं केलं. विशेष म्हणजे त्यांनी हेच नाव पुढे वापरलं आणि लोकांनी दिलेलं नाव व टोपणनाव एक करुन अरविंद अकेला कल्लू असं नाव लिहिण्यास सुरुवात केली.
 

Web Title: arvind akela kallu does liplock scene with father permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.