अर्जुन म्हणतो, तो मी नव्हेच!
By Admin | Updated: March 12, 2015 23:21 IST2015-03-12T23:21:52+5:302015-03-12T23:21:52+5:30
अर्जुन रामपाल मीडियात आलेल्या त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर भडकला आहे. सोशल नेटवर्किंग साइट टिष्ट्वटरवर अर्जुनने आपला संताप व्यक्त केला आहे.

अर्जुन म्हणतो, तो मी नव्हेच!
अर्जुन रामपाल मीडियात आलेल्या त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर भडकला आहे. सोशल नेटवर्किंग साइट टिष्ट्वटरवर अर्जुनने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने टिष्ट्वट केले, ‘मी आणि माझी पत्नी मेहर वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी गेलोय, ही बातमी कन्फर्म करण्याविषयी कुणी विचार केला का?’ अर्जुनने मीडियात येत असलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांचा इन्कार करत पुढे टिष्ट्वट केले, ‘वांद्रे कोर्टात मी नव्हे तर माझा मित्र मार्क रॉबिन्सन आणि त्याची पत्नी वलुश्चा डिसुजा गेले होते.’ मात्र आता स्वत: अर्जुनने टिष्ट्वट करून या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.