'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:53 IST2021-11-05T17:50:59+5:302021-11-05T17:53:35+5:30

अनिल कपूरच्या या पार्टीसाठी मलायकाने खास तयारी केली होती. पिंक सिल्क साड़ी आणि त्यावर गोल्डन ब्लाउज असे कॉम्बिनेशन तिने केले होते.

Arjun Kapoor is very possessive and equally protective for Lady Love Malaika Arora | 'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा

'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा

सगळीकडे सध्या त्यांच्या लग्नाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून मलायका आणि अर्जुन दोघांचे अफेअर सुरु आहे. दोघांचे प्रेम तर जगजाहीर आहे. त्यामुळे दोघे कधी लग्नबंधनात अडकतात याकडेच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता मलायका जिथे जाते तिथे अर्जुन तिच्यासोबत असतो. नुसता सोबतच असतो असे नाही तर तिला प्रोटेक्टही करताना दिसतो. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तो काळजी घेताना दिसतो. नुकतेच अर्जुन आणि मलायका एकत्र दिसले. दोघांनी मीडियाला एकत्र पोजेसही दिल्या. निमित्त होते एका ग्रँड पार्टीचे अनिल कपूर यांनीच या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेस सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र नेहमीप्रमाणे या लव्हबर्डनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. 

 

 

पार्टीसाठी दोघेही एकत्र दिसताच मीडियाचे कॅमेरे दोघांकडे वळले. दोघांचे फोटो घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. याच गर्दीचा मलायकाला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी अर्जुन घेताना दिसला. गाडीतून उतरताच मलायकासाठी गर्दीला बाजुला सारत वाटही मोकळी करुन देताना दिसला. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून. व्हिडीओ पाहून चाहते अर्जुनचे कौतुकही करताना दिसत आहेत. अर्जुन मलायकासाठी नुसता पझेसिव्हच नाही तर प्रोटेक्टिव असल्याचेही पाहायला मिळाले. अनिल कपूरच्या या पार्टीसाठी मलायकाने खास तयारी केली होती. पिंक सिल्क साड़ी आणि त्यावर गोल्डन ब्लाउज असे कॉम्बिनेशन तिने केले होते. तर अर्जुननेही मलायकाला साजेसा असाच ड्रेस परिधान केला होता. यावेळी दोघांचा स्टायलिश अंदाजही चांगलाच भाव खावून गेला.

 

Web Title: Arjun Kapoor is very possessive and equally protective for Lady Love Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.